Akshaya Tritiya 2024 :  मे महिन्यात अक्षय्य तृतीया असणार आहे. यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे. 10 मे रोजी असणार अक्षय्य तृतीया ही शुक्रवारी आली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीत संपत्तीचा कारक शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांच्या संयोगाने शुक्रादित्य योग निर्माण होणार आहे. त्यासोबत शनिदेवामुळे शश राजयोग आणि मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे मीन राशीत धन योग अक्षय्य तृतीयेला असणार आहे. या योगासह गजकेसरी आणि रवि योग असणार आहे. अशा या शुभ योगामुळे काही राशींच्या लोकांचे सुवर्ण काळ सुरु होणार आहे. ( Gold or silver Auspicious Yog dhan yog on Akshaya Tritiya Mata Lakshmi grace will shower on  these 5 zodiac sign people) 


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय्य तृतीयेला असलेले हे शुभ योग वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे ज्यामुळे तुमचे रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. तुम्ही मिळालेल्या पैशातून गुंतवणूकही करु शकता. शिवाय जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. व्यवसायिकांसाठीही हे योग उत्तम सिद्ध होणार आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


अक्षय्य तृतीयाला असणारे शुभ राजयोग हे मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन आला आहे. या लोकांच्या भौतिक सुख आणि सुविधामध्ये वाढ करणार आहे. यांचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. न्यायालयात काही प्रकरण असेल ते तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला मोठी भरपाई मिळणार आहे. कठोर परिश्रमानंतर यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया शुभ ठरणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार असून करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. नवीन काम करण्याचा प्रयत्नांना यश मिळणार आहे. भविष्यातही तुम्हाला चांगेल लाभ होणार आहेत. घरात नवीन सदस्याची एन्ट्री होऊ शकते.


तूळ रास (Libra Zodiac)  


तूळ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा सण सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लाभ होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे अगदी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वैवाहिक जोडप्याला गोड बातमी मिळणार आहे. कुटुंबासोबत बाहरेगावी फिरण्याचा प्लॅन करु शकाल. 


धनु रास (Sagittarius Zodiac) 


अक्षय्य तृतीयेनंतर धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुवर्ण काळ सुरु होणार आहे. बँक बॅलेन्स वाढत असणार आहे. पैसे बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असणार आहे. करिअरमध्ये कुठूनतरी चांगली बातमी मिळणार आहे. उत्तम ऑफरही मिळणार आहे. अडकलेले पैसे मिळणार आहेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)