Dream Interpretation : `ही` 10 स्वप्नं ठरतात खूपच शुभ! धनलाभ होण्याचे संकेत
Dream Interpretation : आपल्याला प्रत्येकाला रात्री झोपल्यावर स्वप्न पडतात. प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही अर्थ असतो, असं शास्त्रा सांगितलं जातं. काही स्वप्न ही आपल्यासाठी शुभ असतात तर काही अशुभ...
Swapn Shastra in Marathi : असं म्हणतात पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. तुम्हाला झोपते स्वप्न पडतात का? प्रत्येकाला कधी ना कधी स्वप्न पडतं. काही स्वप्न खूप चांगली असतात त्यामुळे झोपेतच आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. तर काही स्वप्न इतकी भीतीदायक असतात की आपण घाबरु जागे होतो. आपल्याला पडणारी स्वप्न ही दिवसभर केलेले काम आणि विचार याचा काहीसा भाग असतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नामागे काही तरी संकेत असतात. अगदी ते तुमच्यासाठी शुभ आणि अशुभ ठरतात. आज आपण शुभ स्वप्न आणि कुठली स्वप्न आपल्यासाठी धनलाभ घेऊन येतात, ते पाहूयात. (Good Dreams have you ever seen such dream get money happiness Auspicious Dream Meaning in marathi)
तुम्हाला रात्री कुठलं स्वप्न पडलं?
- जर स्वप्ना तुम्ही स्वत:ला किंवा इतरांना जळताना पाहिलं तर तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
- स्वप्नात देव - देवता किंवा मंदिर पाहिलं तर धनलाभ होतो.
- जर स्वप्नात विंचू, मधुमखी तु्म्हाला चावली तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
- शंख, वस्त्र, दही, चंदन, मोगरा आणि कमळ स्वप्नात पाहिलं तर तुम्हाला धनलाभ होईल.
- स्वप्नात कोणाचे हातपाय दिसले तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
- हे ऐकून आश्चर्य वाटेल, जर तुम्ही स्वप्नात स्मोकिंग करताना दिसले तर तुम्हाला अचानक धनलाभ होईल.
- तुम्हाला जर ध्वजाची वेल किंवा झाड दिसलं तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो.
- तुम्ही स्वप्नात जर तुम्ही कुठल्या धन्याचा ढिगाऱ्यावर किंवा डोंगर, झाडावर चढताना पाहिलं तर तुम्हाला आर्थिक फायदा होतो.
- स्वप्नात पाऊस आणि धगधगणारी आग पाहिली तर तुम्हाला अपार संपत्ती मिळेल.
- तुम्ही स्वप्नात कुठल्याही ऋतुमध्ये फळ किंवा फुलं खाताना पाहिलं तर, तुम्हाला आपत्ती काळात धनलाभ होईल.
(वरील माहितीचा कोणताही पुरावा नसल्यामुळं ती केवळ सर्वसामान्य संदर्भांआधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)