मुंबई : लग्न हे जन्मभराचे बंधन असते. लग्नाबाबतच्या अनेकांच्या अनेकाविध कल्पना असतात. आपला जोडीदार कसा असावा, त्याच्यामध्ये अथवा तिच्यामध्ये कोणते गुण असावेत अशा काही कल्पना असतात. लग्नाच्या सुरुवातीला सगळ काही छान असतं. मात्र त्यानंतर हळूहळू एकमेकांचे स्वभाव कळू लागतात तेव्हा काही एकमेकांना एकमेकांच्या काही गोष्टी खटकण्यास लागतात. यावेळी गरज असते ते एकमेकांनी एकमेकांना समजून घेण्याची. नाहीतर नाती तुटण्यास वेळ लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशींवरुन बऱ्याचदा व्यक्तींच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येऊ शकते. त्यामुळे तुमची होणारी पत्नी जर खालील तीन राशींपैकी असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. या तीन राशीच्या पत्नी सर्वात चांगली पत्नी बनू शकतात.


कर्क - कर्क राशीच्या महिला एखाद्या राणीपेक्षा कमी नसतात. या महिला भावनेला अधिक प्राधान्य देतात. प्रेम व्यक्त करायलाही यांना जमते. घर चांगल्या प्रकारे सांभाळतात. कुटुंबाला आनंद देण्यासाठी कुठेही कसर पडू देत नाही. नवरा आणि कुटुंब यांना अधिक प्राधान्य देतात. थोड्या अधिक भावनात्मक असल्याने काहींना या ड्रामा क्वीन वाटू शकतात. जे पारंपारिक विचारांचे आहेत त्यांच्यासाठी कर्क राशींच्या महिलांशी लग्न करणे चांगला पर्याय बनू शकतो. आपली कोणतरी काळजी घेणारा असावा अशी या महिलांची अपेक्षा असते. 


मेष - मेष राशींच्या महिलांचे व्यक्तिमत्व कणखर असे असते. ज्योतिषांच्या मते मेष राशीच्या महिला पुरुषांना गुडघे टेकण्यास भाग पाडतात. आपले लक्ष्य मिळवण्यासाठी कधीच मागे हटत नाहीत. समाजामध्ये यांना प्रतिष्ठा असते. या महिला आपल्या नवऱ्याला अधिक सक्षम आणि जबाबदार व्यक्ती बनवण्यास मदत करतात. कल्पनेच्या दुनियेत वावरणे यांना आवडत नाही. मात्र या महिलांना इंप्रेस कऱणे फार कठीण असते. या महिला शिस्तप्रिय, थोड्या कठोर असतात. 


सिंह - सिंह राशीच्या महिला एखाद्या योद्ध्याप्रमाणे असतात. ज्यांच्या मनात जागा मिळवणे फार कठीण असते. मात्र एकदा तुम्ही तुमची जागा मिळवली तर तुम्हाला जीवनभर चांगली साथ मिळते. या महिला जोडीदाराप्रती ईमानदार असतात. या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात. या राशीच्या महिला शिस्तप्रिय आणि व्यवस्थित जीवनाला प्राधान्य देतात. या आकर्षक तसेच पॉवरफुल असतात. सिंह राशींच्या महिलांपेक्षा अधिक प्रेम करणारा क्वचितच तुम्हाला भेटेल. आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी काहीही करण्यास या तयार असतात.