Grah Gochar 2023: जानेवारीत 4 ग्रह बदलणार राशी, या राशींनी काळजी घेणं आवश्यक
Grah Gochar: नववर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या वर्षात ग्रहांची काय उलथापालथ होणार? याकडे लक्ष लागून आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेव राशी बदल करणार आहे. शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र आणि सूर्यही राशी बदल करणार आहे.
Grah Gochar In January 2023: नववर्षाच्या स्वागतासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या वर्षात ग्रहांची काय उलथापालथ होणार? याकडे लक्ष लागून आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेव राशी बदल करणार आहे. शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र आणि सूर्यही राशी बदल करणार आहे. सूर्यदेव 14 जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र ग्रह 22 जानेवारीला कुंभ राशीत विराजमान होणार आहे. तर मंगळ आणि बुध ग्रह मार्गस्थ होणार आहेत. 12 जानेवारीला मंगळ, तर 18 जानेवारीला बुध मार्गस्थ होईल. ज्योतिष जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ग्रहांच्या गोचराचा पाच राशींवर परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे काही बाबतीत सतर्क राहणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात या पाच राशी कोणत्या आहेत.
मेष (Mesh)- ग्रह गोचराचा या राशीवर परिणाम दिसून येईल. काही कामं मोक्याच्या ठिकाणी अडकतील. तसेच खर्च नियंत्रणाबाहेर होईल. तसेच नातेवाईकांसोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही ताण दिसून येईल. मंगळवारी सुंदरकांडचं पठण केल्यास संकटं सौम्य होतील.
कर्क (Kark)- ग्रहांची स्थिती पाहता जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. थोड्या थोड्या कारणावरून भांडणं होऊ शकतात. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं.
कन्या (Kanya)- या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल, मात्र खर्चही दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक तक्रारी भेडसावू शकतात. कुटुंबात वाद वाढू शकतो. कामाच्या ठिकाणीही अडचण येऊ शकते. या काळात गुंतवणूक करू नका. गायीला प्रत्येक बुधवारी पालक खायला द्या.
बातमी वाचा- मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
वृश्चिक (Vrushchik)- या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरी बदलण्याचा सध्या तरी विचार करू नका. भावासोबत संबंध बिघडू शकतात. गुंतवणूक करताना काळजी घ्या. काही गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकतो. काही निर्णय घेण्यापूर्वी निर्णय घ्या. सूर्यदेवाला पाण्यात गूळ टाकून अर्घ्य द्या.
कुंभ (Kumbh)- जानेवारी महिन्यात न्यायदेवात शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या जातकांना मधल्या साडेसातीचा टप्पा सुरु होईल. नोकरदार वर्गाने काळजी घ्यावी. या काळात रागावर नियंत्रण ठेवा आणि जितकं नम्र राहता येईल तितकं राहा. शनिवारी हनुमान चालीसेचं पठण करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)