November Grah Gochar: ऑक्टोबर महिना संपण्यासाठी पाच दिवसांचा अवधी उरला असताना पुढील महिन्यांचं गणित बांधलं जात आहे. त्यामुळे पुढचा महिना आपल्या राशीसाठी कसा असेल? याबाबत उत्सुकता लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच ग्रह राशी बदल करणार आहेत. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यात पाच ग्रह राशी बदल करणार आहे. 11 नोव्हेंबरला शुक्र, 13 नोव्हेंबरला मंगळ आणि बुध, 16 नोव्हेंबरला सूर्य आणि 24 नोव्हेंबरला गुरू मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या या गोचरामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात पुढील महिना कोणत्या राशींना चांगला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- चंद्रग्रहणाचा कालावधी सोडला तर या राशीसाठी महिना चांगला जाईल. बृहस्पती मार्गस्थ होणार असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील. या काळात वेगवेगळ्या मार्गाने पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सूर्य गोचर या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. शुक्र गोचराचा व्यापाऱ्यांना विशेष फायदा होईल.


कर्क- नोव्हेंबरमधील ग्रहांचा गोचर या राशीसाठी फलदायी ठरेल. सूर्य गोचर आणि गुरु मार्गस्थ होत असल्याने शुभ परिणाम दिसतील. या काळात या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. 


Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र


सिंह- या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर लाभदायक ठरणार आहे. शुक्र बदलामुळे लाभ आणि समृद्धी मिळू शकते. मंगळ गोचर विद्यार्थ्यांसाठी चांगले ठरेल. बुध गोचर व्यवसायात लाभ देऊ शकतो. 


कन्या- नोव्हेंबरमध्ये या राशीच्या लोकांची प्रगती होईल. सूर्य आणि गुरूची स्थिती लाभ देईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. या दरम्यान अनेक फायदे मिळू शकतात.