Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु ग्रह ठाण मांडून आहे. 

Updated: Oct 26, 2022, 03:50 PM IST
Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र title=

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु ग्रह ठाण मांडून आहे. चंद्र-सूर्य यांचा राहु-केतु या ग्रहांशी संबध आला तर ग्रहण लागतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. नुकतंच झालेलं सूर्यग्रहण तूळ राशीत झालं होतं. या राशीत केतू हा पापग्रह दीड वर्षांसाठी बसला आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रहणांचा ग्रहांच्या गोचराशी जुळून आला आहे. यावेळचं चंद्रग्रहण खग्रास असणार आहे. 

भारतातील पूर्वोत्तर भागातून हे ग्रहण दिसणार आहे. तर इतर भागातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, रांची, गुवाहाटी येथून चंद्रग्रहण दिसणार आहे. जगभरात हे ग्रहण ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतून दिसणार आहे.

 

  • चंद्र ग्रहण तारीख: 8 नोव्हेंबर 2022
  • ग्रहणाला सुरुवात: संध्याकाळी 5.32 वाजल्यापासून
  • ग्रहण समाप्ति- संध्याकाळी 6.18 वाजेपर्यंत
  • सूतक कालावधी सकाळी 9.21 वाजल्यापासून 
  • सूतक कालावधी समाप्ति: संध्याकाळी 6.18 वाजेपर्यंत

मेष- या राशीत चंद्र ग्रहण होत असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. या राशींच्या लोकांना आरोग्यविषय समस्या जाणवू शकते.

वृषभ- या राशीवर चंद्रग्रहणाचा चांगला-वाईट परिणाम दिसून येईल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. पण परीक्षेत अपयश येण्याची शक्यता आहे.

मिथुन- या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचे शुभ परिणाम दिसून येतील. धनलाभ होऊ शकतो.

कर्क- कर्क राशीसाठी हे चंद्रग्रहण डोकेदुखी ठरू शकते. नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिंह- चंद्रग्रहण काळात या राशीच्या वैवाहिक आणि प्रेमसंबंध आणखी दृढ होतील. तसेच लग्नाचा योग जुळून येण्याची शक्यता आहे.

भारतीय चलनी नोटेवर गणपती-लक्ष्मीचा फोटो लावल्यास फायदा! काय सांगतं ज्योतिषशास्त्र? वाचा

कन्या- या राशीच्या लोकांना चांगले-वाईट परिणाम जाणवतील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तसेच कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

तूळ- चंद्रग्रहण काळात आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करा.

वृश्चिक-  या राशीसाठी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण शुभ ठरेल. या काळात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

धनु- चंद्रग्रहणाच्या प्रभावाने नोकरीत चढ-उतार दिसू शकतात. वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो.

मकर- या राशीसाठी चंद्रग्रहण शुभ ठरेल. मान-सन्मान वाढेल. या काळात वाहन खरेदीचा योग जुळून येईल.

कुंभ- या राशीच्या लोकांना या काळात नवी जबाबदारी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

मीन- या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पैसा विचारपूर्वक खर्च करावा लागेल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)