Grah Gochar In September 2022: ऑगस्ट महिना संपल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यातील नियोजनाच्या दृष्टीकोनातून मांडणी केली जात आहे. त्याचबरोबर ग्रह नक्षत्र आपल्याला साथ देतील का? असा प्रश्नही जातकांना पडला आहे. सप्टेंबर महिना ग्रह गोचराच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य ग्रह राशी बदल करणार आहेत. या व्यतिरिक्त बुध ग्रह वक्री होणार असून शुक्र अस्ताला जाणारा आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळ मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या या स्थितीमुळे काही राशींना आर्थिक तसेच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंह- व्यवसायाशी निगडीत लोकांनी एखादा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अन्यथा अडचणीचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना काळजी घ्या, नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात आरोग्याची काळजी घ्या.


तूळ- या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. उद्योगपतींना अपेक्षित यश मिळणार नाही. वैवाहिक जीवनात कलह येऊ शकतात. काही गोष्टींवर वाद होऊ शकतात. आपलं बजेट पाहून खर्च करा. या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


वृश्चिक- सप्टेंबर महिन्यात आर्थिक आणि आरोग्याशी निगडीत समस्या येतील. आर्थिक स्थिती पाहूनच खर्च करा, अन्यथा बजेट कोलमडून जाईल. मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात.


मकर- सप्टेंबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना करिअर संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात जरा जपूनच वागा. विचारपूर्वक गुंतवणुकीचा निर्णय घ्या. योग आणि मेडिटेशन कराल आणि सकारात्मक विचार कराल. आरोग्यविषयक समस्या भेडसावू शकतात.


धनु- या राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतार असणारा असेल. मेहनतीला फळ मिळेल पण त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं. त्याचबरोबर जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. त्यामुळे या काळात धीराने वागा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)