Gudi Padwa Shubh Muhurat and Significance in Marathi: गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी (Gudhi Padwa 2023) मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवस हाच भारतीय संस्कृतीनुसार 'चैत्र शुद्ध प्रतिपदे'चा दिवस असतो. म्हणजेच या वर्षापासून हिंदूचं नवीन वर्ष सुरु होतं. श्री शालिवाहन राजाने शके गणनेला याच दिवसांपासून सुरुवात केल्याने शालिवाहन शकंही याच दिवशी बदलतं. गुढीपाडव्याचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा असतो. या दिवशी गुढीला विशेष महत्त्व असतं. गुढी उभारण्यासाठी वापरलं जाणारं साहित्यही तितकेच महत्त्वाचं असतं. या साहित्यामधील प्रत्येक गोष्ट काही ना काही संकेत देत असते. गुढी ही जितकी पवित्र मानली जाते तितकेच ती उभारण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही पवित्र मानले जाते. गुढी उभारताना कोणत्या गोष्टींचा वापर होतो आणि त्या काय सुचित करतात हे जाणून घेऊयात...


गुढीसाठी लागणारं साहित्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- कलश, कडुंलिंबाची पानं, पुष्पहार, साखर गाठी, जरीची साडी, वेळूची काठी, श्रीफळ, हळदी-कुंकू, पाट अथवा चौरंग, सुपारी


वस्तूंचे महत्त्व काय?


कलश - गुढीच्या सर्वात वरील भागावर असलेला कलश हा यशाचं प्रतिक असतो.


कडुलिंब- कडुलिंबचा पाला हा आरोग्याचं प्रतिक असतो.


फुलांचा हार - फुलांचा हार मांगल्याचं प्रतिक मानला जातो.


साखर गाठी - साखरेची गाठ ही माधुर्य आणि गोडवा निर्देशित करते. 


जरीची साडी - जरीची साडी हे वैभवाचं प्रतिक मानलं जातं.


वेळूची काठी - ज्या काठीवर गुढी उभी केलेली असते ती वेळूची काठी सामर्थ्याचं प्रतिक असते.


नक्की वाचा >> Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?


श्रीफळ - गुढी उभारली जाते तिथे ठेवण्यात येणारा नारळ हा सिद्धीचं प्रतिक असतो. 


हळदी - कुंकू - गुढीला वाहिलं जाणारं हळदी-कुंकू हे सौभाग्याचं प्रतिक असतं. 


पाट अथवा चौरंग - गुढी ज्या पाटावर उभी केली जाते तो पाट स्थैर्याचं प्रतिक असतो. 


सुपारी - सुपारी ही संकल्पाचं प्रतिक असतं.



मुहूर्त कधी?


चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा प्रारंभ हा मंगळवारी म्हणजेच 21 मार्च रोजी रात्री 09.22 पासून होतो. तर समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे. तिथी नुसार 22 मार्च 2023 बुधवारला गुढी पाडवा साजरी होणार 
गुढीपाडव्याचा पूजा मुहूर्त हा 22 मार्च रोजी सकाळी सकाळी 06.29 ते सकाळी 07.39 दरम्यान आहे.