Gudi Padwa 2024 : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडव्याचा (Chitra Padwa) सण महाराष्ट्रात मराठी नूतन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. दाराला आंब्याचा पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण, दारासमोर सुरेख रांगोळी, घरात मंगलमय वातावरण आणि उंच उंच अशी गुढी...नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी. महाराष्ट्रात नवं वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येते. नववारी साडी, हिरव्या बांगड्या मराठी साजश्रृंगार महिला मंडळासह लहान मुलं या शोभा यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. चैत्र महिन्याची सुरुवात आणि विजयाच प्रतिक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. घरोघरी गुढी उभारली जाते, पण ही गुढी कधी आणि कशी उतरावी याबद्दल शास्त्र काय सांगत जाणून घ्या. (Gudi Padwa how to remove gudi scientic and significance of gudi padwa traditions)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीराम प्रभू 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतात. त्याचा उत्साह म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. गुढी पाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने यादिवशी सोने खरेदीसह घर, कार आणि मालमत्ता खरेदी केली जाते. त्याशिवाय गुढीपाडव्याला पंचांगाची पूजा करण्यात येते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by PRISHkaishq (@prishkaishq)


पाडव्याला गुढी कशी अन् कधी उतरवावी? 


9 एप्रिलला सकाळी 06:02 ते 10:17 या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करुन ती उभारावी. तर गुढी ही सूर्यास्ताच्या पूर्वी उतरवावी. 9 एप्रिलला सूर्यास्त संध्याकाळी 06.54 मिनिटाला होणार आहे. त्यामुळे या वेळेच्या आधी गुढी उतरावी. आता ही गुढी कशी उतरवावी याबद्दल जाणून घ्या. ज्याप्रकारे तुम्ही सकाळी गुढीची पूजा केली तशीच गुढी उतवण्यापूर्वी पूजा करावी. गंध, फुलं,अक्षता, हळदी-कुंकू, निरांजन आरती करावी. उदबत्ती लावावी. गुढी समोर साखरेचा नैवेद्य दाखवा, नमस्कार करा आणि गुढी उतरावी. 


 गुढीच्या साहित्याचं काय करावं?


गुढी खाली उतरल्यानंतर कडूलिंबाची पानं, आंब्याची पानं आणि हार पाण्यात विसर्जित करावी. तुम्ही कडुलिंबाची पानं धान्यातही मिक्स करु शकता. साखरेची गाठी प्रसाद म्हणून वाटा. साडी किंवा ब्लाऊज पिस घरातील स्त्री वापरु शकते. याशिवाय तुम्ही कोणाला दानही करु शकता. गुढीचा नैवेद्य हा गायीला खाऊ घाला. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)