Gupt Navratri 2022: उद्यापासून गुप्त नवरात्रीचा उत्सव, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
हिंदू पंचागानुसार, देवी दुर्गेची नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते.
Gupt Navratri 2022 Ghat Sthapna: हिंदू पंचागानुसार, देवी दुर्गेची नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते. यामध्ये शारदीय आणि चैत्र नवरात्री देशभरात थाटामाटात साजरे केले जातात. त्याचवेळी माघ आणि आषाढमध्ये येणारी गुप्त नवरात्रीही तितकीच महत्त्वाची आहे. यावेळी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र 30 जूनपासून सुरू होत आहे. गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र-मंत्र आणि तंत्रविद्येची साधना केली जाते. गुप्त नवरात्रीच्या दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये? जाणून घेऊया.
गुप्त नवरात्रीच्या दिवसांमध्येही दुर्गा देवीची पूजा केली जाते. या दरम्यान 9 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळले जाते.
गुप्त नवरात्रीमध्ये तामस्की भोजनाचा त्याग करावा. जेवणात लसूण आणि कांद्याचा समावेश करू नका.
नऊ दिवस भक्तांनी अंथरुणाऐवजी कुशाच्या चटईवर झोपावे.
ज्योतिषशास्त्रानुसार या नऊ दिवसात पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.
जर तुम्ही गुप्त नवरात्रीचे व्रत ठेवत असाल तर या काळात नुसती फळं खा.
मनापासून देवी दुर्गेची आराधना करा. आईवडिलांची सेवा आणि आदर करा.
गुप्त नवरात्रीचे महत्त्व
देवी दुर्गेच्या गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र-मंत्र, जादूटोणा, वशीकरण इत्यादी सिद्धी प्राप्तीसाठी ध्यान केले जाते. त्याचबरोबर दुर्गादेवीच्या कठोर तपश्चर्येने आणि भक्तीने माता प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे.
देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा
नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नऊ रूपांची पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये तारा, त्रिपुरा सुंदरी, भुनेश्वरी, छिन्नमस्ता, काली, त्रिपुरी भैरवी, धुमावती, बगलामुखी माता या महाविद्या देवतांची पूजा विधीपूर्वक केली जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)