Gupt Navratri 2023 Evil Eye : आई वडिलांसाठी त्यांचं मुलं हे जगातील सर्वात मोठी पूंजी असते. त्याचा आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आई वडील अहोरात्र मेहनत करत असतात. पण जर तुमचं मुलं सतत आजारी पडतं असले. तर अशावेळी घरातील मोठी मंडळी त्याला नजर लागली असेल असं म्हणतात. कारण कधी कधी औषधं देऊन, सगळ्या प्रकारची काळजी घेऊनही मुलं आजारी पडतात. त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाची तरी वाईट नजर लागली असणार, असं म्हटलं जातं. आजपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्री सुरु झाली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण (Buri Nazar Se Bachne Ke Upay) करायचं असेल तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आली आहे.  त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हीही हे उपाय करा आणि तुमच्या मुलाला वाईट नजरेपासून वाचवा. (gupt navratri 2023 protect your children from the evil eye do this upay and totke on gupt navratri marathi news)


गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 5 गोमती चक्रे घेऊन घरातील मंदिरात माँ दुर्गेच्या मूर्तीसमोर लाल कपड्यावर अर्पण करा. 


गुप्त नवरात्रीत 9 दिवस माँ दुर्गाला रोळीने टिळक करा आणि पाच अगरबत्ती लावा. 


त्यानंतर अगरबत्तीची राख घेऊन गोमती चक्रांवर तिलक करा. 


ही पूजा रोज नवमी तिथीपर्यंत म्हणजे 30 जानेवारीपर्यंत करा. 


नवमीच्या दिवशी पिवळ्या कपड्यातून गोमती चक्र मुलावर उतरुन दक्षिण दिशेला फेकून द्या.


त्याशिवाय गोमती चक्र माँ दुर्गेच्या पायांना स्पर्श केल्यानंतर मुलाच्या गळ्यात घाला. 


उरलेली तीन गोमती चक्रे मुलाच्या जुन्या धुतलेल्या कपड्यामध्ये बांधून कपाटात ठेवा. 


गुप्त नवरात्रीत हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलाला वाईट नजर लागतं नाही. त्यांचं आरोग्य उत्तम राहतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)