Gupt Navratri 2024 Zodiac Signs Affect:  हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व असून वर्षातून 4 वेळा नवरात्री येत असते. दोन गुप्त नवरात्र, चैत्र नवरात्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्या म्हणजे मां काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, माता चिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, माँ ध्रुमावती, माँ बांगलामुखी, मातंगी आणि कमला देवीची पूजा करण्यात येते. वैदिक पंचांगानुसार 10 फेब्रुवारीपासून माघ गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली असून 18 फेब्रुवारीपर्यंत नवरात्री असणार आहे. यंदा माघ गुप्त नवरात्रीला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. या योगामुळे पुढील 9 दिवस काही राशींच्या लोकांना लाभ होणार आहे. (Gupt Navratri 2024 Magh Gupt Navratri auspicious sanyog For the next 9 days this zodiac signs or rashi will get money)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धार्मिक शास्त्रानुसार गुप्त नवरात्रीमध्ये काली मातेची पूजा करण्यात येत असून याला विशेष महत्त्व असते. माघ गुप्त नवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग जुळून आला आहे. हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. पण पुढील 9 दिवस कोणत्या राशींना खूप लाभ होणार आहे ते जाणून घ्या. 


मेष रास (Aries Zodiac) 


गुप्त नवरात्रीपासून मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस दिसणार आहेत. पुढील 9 दिवसात माता राणीच्या कृपेने तुम्ही काही नवीन कामाचा श्रीगणेशा करणार आहात. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. माघी गुप्त नवरात्री मेष राशीच्या लोकांच्या करिअरसाठी शुभ सिद्ध होणार आहे.


मिथुन रास (Gemini Zodiac)


गुप्त नवरात्रीमुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पुढील 9 दिवस सुधारणार आहे. व्यवसायात बळ येईल ज्यामुळे आर्थिक फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. 


कन्या रास (Virgo Zodiac)   


कन्या राशीच्या लोकांना गुप्त नवरात्रीपासून आर्थिक लाभ होणार आहे. येत्या 9 दिवसात आई दुर्गेच्या कृपेने व्यवसायात प्रगती होणार आहे. मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. 


मकर रास (Capricorn Zodiac)  


गुप्त नवरात्री मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)