Guru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! `या` 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट
Jupiter Asta 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो.
Guru Gochar 2023 effect on Zodiac signs : देवगुरु बृहस्पतिच्या स्थितीत यावर्षी अनेक मोठे बदल होत आहेत. काही राशींच्या लोकांसाठी याचा मोठा फायदा दिसून येतं आहे. गुरु गोचरमुळे काही राशींच्या हातात पैसा खेळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु म्हणजे बृहस्पतिला देवगुरु असं म्हटलं जातं. लवकरच बृहस्पतिचा अस्त होणार आहे. हे ज्योतिषशास्त्रात चांगलं मानलं जातं नाही. त्यामुळे काही राशींसाठी हे अतिशय वाईट काळ घेऊन येतो. खरं तर मार्चमध्ये बृहस्पतिचा अस्त होईल आणि गुरुचा उदय होईल. दुसरीकडे, 22 एप्रिल 2023 रोजी, बृहस्पति स्वतःची राशी मीन सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. शिवाय गुरु हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी बृहस्पति मावळत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. (Guru Asta 2023 guru gochar 2023 effect on Zodiac signs will suffer Money problem and daily rashi bhavishya daily horoscope today)
'या' राशींच्या लोकांनी काळजी घ्या!
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी गुरूची स्थिती चांगली मानली गेलेली नाही. या राशीचा स्वामी हा शुक्र आहे. शुक्र हा बृहस्पति यांचा शुत्र मानला जातो. त्यामुळे गुरुच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळू शकतं. शिवाय कोणतही नवीन काम करु नका. व्यापारी वर्गातील लोकांनी व्यवसायात विशेष काळजी घ्या.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची स्थिती अतिशय हानिकारक होऊ शकते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या लोकांना त्यांच्या कामात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. कठोर परिश्रम करूनही तुम्हाला पूर्ण फळ मिळणार नाही.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरूची स्थितीही चांगली नाही. या राशीच्या लोकांना हा काळ तणाव आणि वेदनादायी ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. खासकरुन वैयक्तिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. याशिवाय आरोग्याची काळजी अन्यथा तुम्हाला कोणताही आजार गाठू शकतो. नोकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक राहा कारण सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)