Guru Rahu Yuti Chandal Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतो. गुरु हा ग्रह एक वर्षाने आपलं स्थान बदलतो. त्याच्यासोबत मागे फिरणारा राहू-केतू दीड वर्षात गोचर करतात. अशा स्थितीत मेष राशीत राहू असताना तिथे गुरु ग्रहाने प्रवेश केल्यामुळे गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. येत्या 30 ऑक्टोबर 2023 ला राहू आली स्थिती बदलणार आहे. तर 1 मे 2024 ला गुरु ग्रह इतर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू आणि गुरुमुळे गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. या अत्यंत अशुभ योगामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. त्या काही राशींनी  30 ऑक्टोबर 2023 पर्यंत सांभाळून राहायचं आहे. (guru chandal yog 2023 guru rahu yuti in mesh these zodiac signs money loss till 30 october)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहू आणि गुरुच्या संयोगामुळे मेष राशीत गुरु चांडाळ योग असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा अतिशय घातक ठरणार आहे. गुरु चांडाळ योगाचा या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणार दिसणार आहे. ताप आणि डोकेदुखी या लोकांना त्रासदायक ठरणार आहे. जोडीदारासोबत भांडण होणार आहे. आर्थिक नुकसान होणार आहे. कोणालाही उधार देऊ नका नाही तर तुमचे पैसे परत कधीच मिळणार नाही. नोकरदार लोकांना अनेक अडचणींचा त्रास होणार आहे. 


मिथुन (Gemini)


गुरु चांडाळ योग मिथुन राशीच्या लोकांसाठी विनाशकारी ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहणार आहात. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च होत असल्याने तुमचं आर्थिक गणित बिघडणार आहे. तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आजारपणामुळे हॉस्पिटलच्या पाया चढाव्या लागणार असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणार आहे. तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात समस्या ओढवणार आहे. मोठी गुंतवणूक टाळा. 


कन्या (Virgo)


गुरु चांडाळ योगामुळे कन्या राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम दिसणार आहे. कोणताही जुनाट आजारपणामुळे तुम्ही त्रस्त होणार आहात. काही छुपा आजार तुम्हाला डोकेदुखी होणार आहे. तुमच्या कुटुंबातही एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं आरोग्य ढासळणार आहे. वाहन जपून चालवा, अपघात होण्याची भीती आहे. नोकरी-व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर हा काळ शांत आणि संयमाने काढा. कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)