Rahu Gochar in Meen 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, एखादा ग्रह त्याच्या ठराविक वेळेला राशी बदल करतो. दरम्यान यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असंच गुरु चांडाळ अशुभ योग 30 ऑक्टोबरला संपणार आहे. कारण 30 ऑक्टोबरला राहू ग्रहाचं गोचर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी राहू ग्रह मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गुरु चांडाळ योग समाप्त होणार आहे. अशा स्थितीत या योगाच्या समाप्तीमुळे 3 राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण येणार आहेत. काही राशींसाठी पुढील सहा महिने खूप चांगले जाणार आहेत. जाणून घेऊया गुरु चांडाळ योग समाप्त झाल्याने कोणत्या राशींचं आयुष्य उजळणार आहे.


मेष रास (Aries Zodiac)


गुरु चांडाळ योगाच्या समाप्तीमुळे या राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा योग तुमच्या राशीतच तयार होत होता. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला ज्या समस्या येत होत्या त्यापासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. अपत्य होण्याचीही शक्यता असते. जे व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


गुरु चांडाळ योगाची समाप्ती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात हा योग तयार होत होता. यावेळी ज्या लोकांशी तुम्ही बिघडले होते त्यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. व्यवसायात मोठा करार होईल.


सिंह रास (Leo Zodiac)


गुरु चांडाळ योगाचा शेवट सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. जे राजकारणाशी निगडीत आहेत, त्यांना मग काही पद मिळू शकते. कवी, लेखक आहेत त्यांच्यासाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. भागीदारीची कामं करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकणार आहे. या काळात अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)