Guru Chandal Yoga 2023 : गुरु राहूच्या संयोगाने तयार होतोय अशुभ योग! `या` 4 राशींनी घ्यावी काळजी, नाहीत...
Guru Rahu Yuti 2023 : जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात गुरू आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.
Guru Rahu Yuti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह आपली स्थिती बदलतात तेव्हा कुंडलीतील राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरुन काही शुभ तर काही अशुभ योग तयार होतात. या महिन्यात मेष राशीत राहू आणि गुरुच्या भेटीमुळे गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात या योगामुळे भूकंप येणार आहे. या लोकांनी काळजी घ्यावी, नाही तर त्यांना मोठ्या संकटाच्या सामान करावा लागणार आहे. (guru chandal yoga formed due to guru rahu 4 zodiac signs problem will increase on july)
'या' राशीच्या लोकांनी काळजी घ्या!
मेष (Aries)
मेष राशीत गुरु आणि राहू यांच्या भेटीमुळे गुरु चांडाळ हा अशुभ योग तयार होत आहे. या राशीला त्यामुळे जुलै महिन्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. मनं अस्वस्थ असल्याने योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्याच्या समस्या उध्द्भवणार आहे. जुलै महिन्यात तुम्ही जेवण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिकदृष्टीकोनातून हा महिना खराब आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांनी या महिन्यात सर्तक राहणं गरजेचं आहे. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा शत्रूच्या संख्येत वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा नाही तर वादविवादा सामोरे जावं लागेल. तुमच्या एका चुकीमुळे नातेसंबंध बिघण्याची भीती आहे. आरोग्या समस्यांसोबत अनेक कामं बिघडणार आहेत. हा महिना तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणार आहात.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांना या महिन्यात सर्तक राहावं लागेल. हा महिना कोर्टकचेरीच्या कामासाठी बिलकुल योग नाही. पोटाचा किंवा घशाच्या आजार तुम्हाला होऊ शकतो. लव्ह लाइफ हा महिना गुरु चांडाळ योगामुळे परिणाम होणार आहे. प्रेमसंबंधात तणाव आल्यामुळे तुम्ही उदास असणार आहात.
कुंभ (Aquarius)
गुरु चांडाळ योग हा कुंभ राशीसाठी कठीण ठरणार आहे. जुलै महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना खूप संकटांचा सामना करावा लागणार आहे. प्रगतीमध्ये अडथळे येणार आहेत. कार्यक्षेत्रात तणाव असणार आहे. वैवाहिक जीवनातसाठी हा महिना खूप खराब आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना चिंताजनक आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.