Gajlakshmi Yog: होळीनंतर येतोय `गजलक्ष्मी योग`, या राशीच्या लोकांवर होणार पैश्यांचा वर्षाव!
Gajlakshmi Rajyog Benefits: ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु उच्च राशीत स्थित असतो, त्यांना नेहमी सुख प्राप्त होते. सुख, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती आणि विवाहाचं कारण मानलं जातं.
Guru Gochar In April 2023: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थिरतेनुसार अनेक शुभ राजयोग तयार होतात. ग्रहांच्या स्थिरतेचा शुभ प्रभाव अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात दिसून येईल. 22 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत (Aries) गुरूचे संक्रमण गजलक्ष्मी योग (Gajalakshmi Yoga) तयार करत आहे. गजलक्ष्मी राजयोग कसा तयार होतो आणि राशींवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया....
मेष राशी (Aries) -
मेष राशीच्या (Aries) लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायातही फायदा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
मिथुन राशी (Gemini) -
ज्या क्षेत्रात पाऊल ठेवाल, त्यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्या क्षेत्रात गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला मोठा लाभ मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती निश्चित असेल. त्याचबरोबर विविहाचा देखील योग दिसून येतोय.
धनु राशी (Sagittarius) -
धनु राशीच्या (Sagittarius) लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा फायदाच होईल. तुम्हाला नोकरीच्या नव्या संधी मिळू शकते. बिझनेस करणाऱ्यांना नव्या पैशांच्या संधी चालून येतील. तर वैवाहिक आयुष्यात देखील आनंद मिळेल.
Gajlakshmi Yog म्हणजे काय?
जेव्हा राहु मेष राशीत असतो आणि गुरु त्याच वेळी मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव प्राप्त होते. ज्या राशीत गजलक्ष्मी योग तयार होतो, त्या राशीत शनीची साडेसाती संपते, असं मानलं जातं. जलक्ष्मी योगाच्या प्रभावाने धन-आनंद वाढते आणि निराशेचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
दरम्यान, गजलक्ष्मी योगाच्या प्रभावाने माँ लक्ष्मी आणि गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुबेर देवही आशीर्वाद देतात, असं म्हणतात. गजलक्ष्मी योगाच्या प्रभाव तुमच्या आरोग्यावर देखील जाणवतो. तुमचं आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर जुनाट आजार फार लवकर बरे होतात.