Guru Margi 2022: गोचर कुंडलीत सर्वसमावेश ग्रहांचं भाकीत केलं जातं. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि गोचर कुंडली यावर परिणाम दिसून येतात. आता दोन दिवसांनी वक्री गुरु मीन राशीत मार्गस्थ (Guru Grah Margi) होणार आहे. 24 नोव्हेंबरला सकाळी 4 वाजून 36 मिनिटांनी मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुरु ग्रह 120 दिवसानंतर मार्गस्थ होतो. तसेच गुरु ग्रह अस्ताला गेला की, 30 दिवसानंतर उदय होतो. उदयाच्या 128 दिवसानंतर गुरु वक्री होतो. त्यानंतर मार्गस्थ होतो. गुरु मार्गस्थ होताच आणखी प्रभावी होतो. गुरु ग्रहाला ज्ञान, विवाह, धन, सौभाग्याचा कारक मानलं जातं. कुंडलीत गुरु चांगल्या स्थितीत असल्यास जातकांना चांगली फळं मिळतात. कर्क राशीला गुरु चांगलं फळ देतो. तसेच धनु आणि मीन राशीचा स्वामी असल्याने या राशींवरही कृपा असते. दुसरीकडे, मकर राशीत गुरु नीचेचा असतो आणि त्यामुळे कामात अडथळे येतात. मात्र गुरुची स्थिती कुंडलीत कमकुवत असल्याच अशुभ परिणाम भोगावे लागतात.


गुरु ग्रहाची अशुभ स्थिती काय परिणाम करते.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उच्च शिक्षणात अडचणी येतात आणि शिक्षकांचं हवं तसं सहकार्य मिळत नाही. मिळालेल्या ज्ञानाबाबत अहंकार वाढतो

  • व्यक्ती स्वार्थी होतो आणि स्वभावात हेकेखोरी वाढते.

  • पोटासंबंध आजार बळावतात. त्यामुळे अस्वस्थता वाढते.

  • धार्मिक कार्यात मन रमत नाही. विवाह कार्यात अडथळे येतात.

  • नोकरीच्या ठिकाणी कामात अडथळे येतात. लवकर प्रमोशन होत नाही.


बातमी वाचा- Auspicious Yoga: भगवान राम-श्रीकृष्णाच्या कुंडलीत होते हे पाच योग, जाणून घ्या


गुरुचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपाय


  • पिंपळाच्या पूजेनं गुरुचं बळ वाढतं.

  • पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान केलं पाहीजे.

  • गुरुचं रत्न पुष्कराज परिधान केल्याने अपेक्षित फळ मिळतं.

  • गुरुवारी व्रत करावे. त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. तुम्ही हे व्रत 3, 9 किंवा 16 वर्षे पाळू शकता.

  • देवगुरु बृहस्पतींचा संबंध भगवान विष्णूशी आहे. बृहस्पतींचा प्रभाव कमी करण्यासाठी एकादशीचे व्रत देखील खूप फलदायी मानले जाते.

  • ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः या मंत्राचा जप केल्याने अडचणी कमी होतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)