Guru Pushya Yoga 2023 in marathi : पुष्य योग दर महिन्याला येत असतो पण एप्रिल महिन्यातील पुष्य नक्षत्र योग खूप खास आहे. पुष्य नक्षत्राचं स्वत:चे खास असं महत्त्व असतं. जेव्हा नक्षत्र गुरुवारी म्हणजे आज (27 April 2023 ) आहे.  पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यामुळे याला गुरुपुष्य योग असं म्हटलं जातं. सुख, वैभव आणि संपत्तीसाठी गुरुपुष्यमृत योग ज्या दिवशी आहे तेव्हा विष्णूबरोबर बृहस्पती देवाची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्र आहेत. (guru pushya yoga date shubha yog muhurta upay and importance in marathi)


गुरुपुष्यमृत योगाचा दिवशी दुर्मिळ योग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुपुष्यमृत योगासोबत वरियान योगासह सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योगही आहेत. शिवाय शुभकर्तारी, वरिष्ठ, भास्कर, उभयचरी, हर्ष, सरल आणि विमल नावाचा राजयोगही जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला गेला आहे. 


अमृत सिद्धी योग


सकाळी 07:00 ते दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल 2023 शुक्रवारी सकाळी 05:06 पर्यंत असणार आहे. 


सर्वार्थ सिद्धी योग


सर्वार्थ सिद्धी योग हा संपूर्ण दिवस असणार आहे. 


गुरुपुष्य योग


सकाळी 07:00 ते दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल 2023 शुक्रवारी सकाळी 05:06 पर्यंत असणार आहे. 


गुरुपुष्यमृत योग मुहूर्त


गुरुपुष्यमृत योग हा गुरुवार 27 एप्रिल 2023 ला सकाळी 06:55 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 28 एप्रिल 2023 ला सकाळी 06:27 वाजेपर्यंत राहणार आहे. 



अभिजित मुहूर्त : दुपारी 12:11 मिनिटे ते 01:2 मिनिटापर्यंत.
विजय मुहूर्त : दुपारी 02:44 मिनिटे ते 03:35 मिनिटापर्यंत.


गुरुपुष्य योगाचे महत्त्व


गुरुवारी हा श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास सुख, वैभव आणि संपत्ती प्राप्त होते. याशिवाय या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहे. म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव यांचा गुरुपुष्यमृत योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाचा गुरुपुष्यमृत योग सर्वोत्तम आणि भाग्यशाली दिवस आहे. 


गुरुपुष्य योगात करण्याचे उपाय


महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी नारायणांची पूजा करा. पूजेमध्ये 'ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:' या मंत्राने 108 वेळा जप करा. 


या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखची पूजा करा.


या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. तर नोकरदार वर्गांनी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करा. 


गुरु पुष्य योगात एकाक्षी नारळाची पूजा करा. 


गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही मां लक्ष्मीचे चमत्कारीक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. 



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)