Guru Pushya Yog 2023 : मराठी पंचांगानुसार आता मार्गशीर्ष महिना सुरु आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातील हा शेवटचा महिना असून सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. हा आठवडा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार खास आहे. या आठवड्यात ग्रहांचा गोचरमुळे अनेक योग निर्माण होत आहेत. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या (Margashirsha Guruwar) शुभ मुहूर्तावर तयार होतो आहे. 28 डिसेंबरला हा गुरुपुष्यमृत योगला रात्री उशिरा सुरु होणार असून 29 डिसेंबरपर्यंत हा योग असणार आहे. गुरु पुष्य योग हा वर्ष 2024 मध्ये काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. (guru pushya yoga on of Margashirsha Thursday 29th december 5 zodiac sign people get wealth with fortune)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ राशीच्या लोकांना गुरु पुष्य योग हा खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. जीवनात अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला फायदा होणार आहे. संपत्तीत वाढ होणार आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाच्या बाबतीत प्रचंड लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगली टूर प्लॅन करू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या वर्षाचा शेवट काही चांगल्या बातमीने होईल. ऑफिसमध्येही काही चांगली बातमी येऊ शकते.


सिंह रास (Leo Zodiac) 


सिंह राशीच्या लोकांसाठी वर्ष 2024 पासून आनंदाचा काळ सुरु होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहे. आर्थिक स्थिती तुमची सुधारणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.  


कन्या रास (Virgo Zodiac)   


गुरु पुष्य योगाच्या प्रभावामुळे 2024 हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. पैशाशी संबंधित वादातून तुम्हाला आराम मिळणार आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार असल्याने तुम्ही समाधानी आणि आनंदी असणार आहात.


तूळ रास (Libra Zodiac)  


गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळून निघणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडणार आहे. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. तुम्ही आनंदी जीवन जगणार आहात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)