Jupiter Retrograde 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमधील शनि आणि गुरु महत्त्वाचे ग्रह आहे. गुरु ग्रहाला देवगुरुचा दर्जा देण्यात आला आहे. देवगुरु बृहस्पती एका वर्षाच्या अंतराने आपलं स्थान बदलतो. गुरु ग्रहाने एक वर्षांनंतर स्वगृही मीन राशीत 22 एप्रिल 2023 ला प्रवेश केला. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात गुरू प्रतिगामी अवस्थेत येणार आहे. गुरु वक्रीमुळे 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण त्यातील 3 राशींच्या लोकांवर बृहस्पतिची विशेष कृपा असणार आहे. कोणत्या राशींवर शुभफळ देणार आहे, ते जाणून घेऊयात.  (Guru vakri 2023 in Meen Jupiter Retrograde 2023 These people will be rich guru gochar)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर महिन्यापासून मेष राशीच्या लोकांचं आयुष्य बदलणार आहे. गुरुदेव त्यांना अपार संपत्ती देणार आहे. प्रत्येक कामात नशीबाची साथ काय असतं हे त्यांना कळणार आहे. रखडलेली कामं सहज मार्गी लागणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. करिअर आणि व्यसायात यशाची पायरी चढणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मनं रमणार आहे. 


मिथुन (Gemini)


गुरु वक्री मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक फायदा घेऊन येणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार तर आहेच सोबत फायदा पण होणार आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होणार आहे. तुम्ही लक्झरी म्हणजे भौतिक वस्तूंची खरेदी करणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. कौटुंबातही उत्साह आणि आनंद असणार आहे. नवीन मालमत्ता खरेदीचा योग आहे. 


कर्क (Cancer)


गुरु वक्रीमुळे कर्क राशीच्या लोकांचा भाग्यदोय होणार आहे. अचानक अनेक मार्गाने तुम्हाला धनलाभ होणार आहे.  करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे उंच आलेख तुम्ही चढणार आहात. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन आणि इंक्रीमेंट होणार आहे. आर्थिक बाबतीत मोठी घडामोड होणार आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. चांगल्या नोकरीचीही संधी मिळणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा - शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)