Guru Vakri Yog : सप्टेंबर महिन्या हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ज्ञान, संतती आणि संपत्तीचा कारक  गुरु 14 सप्टेंबरपासून 118 दिवसांसाठी उलट दिशेने जाणार आहे. त्यामुळे गुरुची ही प्रतिगामी अवस्था  5 राशींच्या लोकांसाठी अतिशय फलदायी आणि भाग्यशाली ठरणार आहे. सध्या गुरु मेष राशी असून 4 सप्टेंबरपासून गुरु 31 डिसेंबरपर्यंत वक्री राहील. (guru vakri 2023 jupiter 4 September to 31 December Guru Vakri Yog these zodiac signs immense money 118 days)


'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली 


मिथुन (Gemini)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरू मिथुन राशीतून अकराव्या घरातून भ्रमण करत असून अकरावं घर हे गुरूचं स्वतःचं स्थान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. तुमची प्रगती आणि यश या दिवसांमध्ये दिसणार आहे. 


सिंह (Leo)


गुरु वक्री हे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना 31 डिसेंबरपर्यंत चांगल फलदायी ठरणार आहे. सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. संतानसुखाची गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे. या दिवसांमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या सप्तम भावातून गुरु भ्रमण करत असल्याने यांना लोकांना तो शुभदायी ठरणार आहे. नोकरदारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यांचा कष्टाचं सोनं होणार आहे. तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत होणार आहात. काही वाद असतील तर ते संपुष्टात येणार आहे. 


धनु (Sagittarius)


गुरु हा धनु राशीचा स्वामी आहे. त्यामुळे तुम्हाला तो वरदानपेक्षा कमी ठरणार नाही. या काळात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. धार्मिकदृष्टीकोनातून प्रवास घडणार आहे. अचानक घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. त्यामुळे तुमची पैशांची समस्या दूर होऊन बँक बॅलेन्स वाढणार आहे. 


मीन (Pisces)


गुरु हा मीन राशीचा स्वामी असल्याने यांच्यासाठी गुरु वक्री वरदान ठरणार आहे. तुमच्यावरील कर्जाचे ओझे या दिवसांमध्ये उतरणार आहे. पैशांच्या आगमनामुळे अनेक समस्या दूर होतील. नोकरी आणि व्यवसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध वक्रीमुळे 'या' राशींवर आणणार संकट, 15 सप्टेंबरपर्यंत राहा सतर्क


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.