Guru Vakri In Mesh Rashi: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान बृहस्पति देवांचा गुरू काही काळानंतर राशी बदलतो. ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गुरु मेष राशीमध्ये असून 4 सप्टेंबर रोजी ग्रहाने या राशीच्या चिन्हात वक्री चाल चालली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर ही घटना घडतेय. 31 डिसेंबरपर्यंत मेष राशीत वक्री गतीने वाटचाल करणार आहे. दरम्यान यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर गुरुच्या वक्रीचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना गुरुच्या वक्री स्थितीचा फायदा होणार आहे. 


मेष रास (Mesh Zodiac)


गुरुच्या वक्री चालीचा या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नतीद्वारे आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना अधिक नफाही मिळू शकतो. अशा परिस्थितीत नशीब तुमची पूर्ण साथ देणार आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थितीही मजबूत होऊ शकते. तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकणार आहे.


सिंह रास (Sinh Zodiac)


गुरुच्या वक्री चालीचा या राशीच्या लोकांना फायदा होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. नोकरीत प्रगतीसोबत प्रमोशन मिळू शकते. गेल्या काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकही यश मिळवू शकतात. एखाद्याच्या भागीदारीत केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय शुभ परिणाम देणार आहे.


मीन रास (Meen Zodiac)


या राशीमध्ये गुरु दुसऱ्या घरात वक्री आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायातही फायदा होईल. व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रशंसा मिळवाल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )