Amla Rajyoga/Guru Vakri : ज्ञान, विवाह, धन, सौभाग्याचा कारक गुरु ग्रह 4 सप्टेंबरला वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महत्त्वाचा राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये यशासोबत तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे. बृहस्पतिच्या हालचालीतून विपरीत (Viprit rajyog) आणि अमला राजयोग निर्माण झाला आहे.  या राजयोगामुळी काही मंडळी धनवान होणार आहे.  (Guru vakri jupiter amla rajyoga and Viprit rajyoga these zodiac shine will get money rain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंडलीतील दहावं घर अतिशय महत्त्वाचं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत बुध, शुक्र, गुरु 10 व्या भावात स्थित असल्यास त्या मंडळींना आर्थिक लाभ होतो. कुंडलीत चंद्र किंवा आरोहापासून दशम भावात एखादा शुभ ग्रह असल्यास राजयोग तयार होता तो जाचकांना भरपूर लाभ देतो. 


मिथुन (Gemini Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी गुरुची बदलची चाल अनेक सकारात्मक परिणाम दाखवणार आहे. या लोकांच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. नोकरीत सुरु होणारे अडचणी दूर होणार आहेत. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. संपत्ती आणि समृद्धीचा सुंदर योग गुरु वक्रीमुळे जुळून आला आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.


सिंह (Leo Zodiac)


या राशीच्या कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत स्थितीत असून तुम्हाला सरकारी नोकरीत लाभ मिळणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमच्या अनेक दिवसांपासूनच्या समस्या दूर होणार आहे. तुम्हाला अतिशय अनपेक्षित लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसणार आहेत. मालमत्तेसंदर्भातही आनंदाची बातमी मिळणार आहे. 


मीन (Pisces Zodiac)


या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. यासोबतच तुम्हाला व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लाहू शकते. मात्र त्यातूनही तुम्ही सहज मार्ग काढू शकणार आहात. या राजयोगामुळे तुमचे नशीब पालटणार आहे. उच्च स्थानावर राहु, शुक्र त्यांची संपत्ती दुप्पट करणार आहे. 


हेसुद्धा वाचा -  September Grah Gochar 2023 : 'या' 6 राशींसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ, सर्व अडथळे दूर होतील, मिळेल भरघोस यश


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)