Guruwar Upay: आपल्या शास्त्रात प्रत्येक दिवसाचे असे एक खास महत्त्व असते. आपण आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टींचे योग्य पद्धतीनं पालन करण्याचा प्रयत्न करतो. कधी इंटरनेटवर त्या गोष्टीचे महत्त्व जाणून घेतो तर कधी लोकांशी बोलून त्या दिवसाचे महत्त्व (Day Importance in Bhavishya) समजून घेतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या प्रत्येक दिवसाचे त्याचे एक महत्त्व आहे. त्यामुळे आपण रोज सकाळी उठल्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जाणून घेऊया गुरूवार या दिवसाचे फायदे नक्की (Guruwar Benefits) काय आहेत. या दिवशी तुम्ही असं काय करू शकता की ज्यानं तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व काय आहे. (Guruwar upay these are the astro tips for prosperity and luck know more)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आठवड्याच्या प्रयत्न दिवसात महत्त्व असते ते म्हणजे प्रत्येक दिवसाला कुठल्यातरी देवदेवतांचे (God) हे विशेष महत्त्व असते. उदाहरणार्थ सोमवार हा शंकराचा वार असतो आणि मंगळवार हा गणपतीचा (GanpatI) असतो. त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे खास असे महत्त्व आहे. त्यातला असाच एक महत्त्वाचा वार म्हणजे गुरूवार. गुरूवार हा विष्णूचा (Vishnu) आणि बृहस्पतीचा (Bruhaspati) असतो. तेव्हा या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पुजा केली जाते. या दोन देवांची या दिवशी पुजा केलीत तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. जोतिषशास्त्रात या दिवसाचे महत्त्वही मोठे आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही असे काही उपाय केलेत ज्यानं भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाला प्रसन्न केलेत तर तुम्हाला आर्थिक लाभही (Financial Benefits) होऊ शकतो. जाणून घ्या गुरूवारचे उपाय. 


1. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काय कराल? -


जर का तुम्हाला आयुष्यात चांगली आर्थिक भरभराट हवी असेल तर तुम्ही गुरूवार भाताची खीर बनवा आणि त्यात थोडीसे केशर घाला आणि त्याचा प्रसाद तुम्ही भगवान विष्णूला दाखवा आणि मग तो प्रसाद म्हणून तुम्ही तो स्वत:ही खाऊ शकता. 


2. केळ्यांचे घड घालावा - 


तुम्हाला धनलाभ हवा असेल तर तुम्ही केळ्याचे घड पिवळ्या कपड्यातून घालून गळ्यात घालू शकता ज्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला कसलेच त्रास होत नाहीत. खासकरून तुम्हाला आर्थिक त्रास होत नाहीत. 


3. लग्नासाठी उशीर होत असेल तर आधी हे काम करा -


गुरूवार हा बृहस्पतीचा वार असतो तेव्हा केळ्याच्या झाडाची पूजा करणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. केळ्याच्या झाडाची तुम्ही विविध प्रकारे पुजा करू शकता आणि पूजा झाल्यानंतर चण्याची दाळ आणि गुळ यांचा प्रसाद द्यावा. त्यानंतर झाडाभोवती तुम्ही सात परिक्रमा घाला. असं केल्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. जो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. 


4. गुरूचा कुंडलीतील दोष कमी करण्यासाठी हा उपाय करा - 


जर तुमच्या कुंडलीत दोष निर्माण झाला असेल तर गुरूवारी बृहस्पती देवाची पूजा करा आणि तुळशीच्या माळेसोबत 108 वेळा बृं बृहस्पती नम: चा जप करावा. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)