Mahashivratri 2023 Shubh Muhurat: महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उत्सवाच्या दरम्यान, अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार, 13 फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर 15 फेब्रुवारीला शुक्र देव मीन राशीत दाखल झाला आहे. त्यामुळे शंकराची पुजा (Lord Shiva) केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे.


महाशिवरात्री का साजरी केली जाते? (Mahashivratri celebration)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवपुराणाच्या कथेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि भगवान विष्णू आणि ब्रहराजी यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसऱ्या कथेनुसार महाशिवरात्रीच्या तिथीला देवी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता, अशी मान्यता आहे.


शंकराची पूजा कधी करावी?  (When to worship Lord Shiva)


महाशिवरात्रीला दिवस रात्र शंकराची पूजा करता येते. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार तासांत भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्यामध्ये रात्रीच्या आठव्या मुहूर्तात निशिथकाल ही पूजा उत्तम आहे, असं ज्योषिशशास्त्रानुसार मानलं जातं.


महाशिवरात्री ला 700 वर्षांनंतर असा मुहूर्त (Mahashivratri Shubh Muhurat)


यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी एक अतिशय शुभ योगायोग घडणार आहे. या वेळी महाशिवरात्रीला केदार, शंख, षष्ठ, ज्येष्ठ आणि सर्वार्थ सिद्धयोग मिळून पंचमहायोग होत आहे. 700 वर्षांनंतर असा मुहूर्त घडतो, असं मानलं जातंय.


महाशिवरात्री पूजेचा चार तासांचा मुहूर्त (Mahashivratri 2023 Puja Time)


  • रात्रीचे पहिले प्रहर: 18 फेब्रुवारी संध्याकाळी 6:21 ते रात्री 9:31 पर्यंत

  • रात्रीचा दुसरा टप्पा: 18 फेब्रुवारी 9:31 ते 12:41 पर्यंत

  • रात्रीचा तिसरा टप्पा: 18-19 फेब्रुवारी रात्री 12:42 मिनिटांपासून 3:51 मिनिटांपर्यंत

  • रात्री चौथा प्रहार: मध्यरात्री नंतर 3:52 मिनिटे ते सकाळी 7:01 मिनिटे


महाशिवरात्री 2023: भारतातील प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग मंदिरे (Fomous 12 Jyotirlingas Temples Of Lord Shiva In India)


  • सोमनाथ (Somnath ) - गुजरातमधील गीर सोमनाथ

  • नागेश्वर (Nageshwar ) - गुजरातमधील दारुकावनम

  • भीमाशंकर (Bhimashankar ) – पुणे महाराष्ट्रात

  • त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar ) – महाराष्ट्रातील नाशिक

  • घृष्णेश्वर (Grishneshwar ) – औरंगाबाद महाराष्ट्रात

  • वैद्यनाथ (Vaidyanath ) - झारखंडमधील देवघर

  • महाकालेश्वर (Mahakaleshwar ) - मध्य प्रदेशातील उज्जैन

  • ओंकारेश्वर (Omkareshwar ) - मध्य प्रदेशातील खंडवा

  • काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) – वाराणसी, उत्तर प्रदेश

  • केदारनाथ (Kedarnath ) - उत्तराखंडमधील केदारनाथ

  • रामेश्वरम (Rameshwaram ) - तामिळनाडूमधील रामेश्वरम बेट

  • मल्लिकार्जुन (Mallikarjuna ) - आंध्र प्रदेशातील श्रीशैलम