Hartalika 2024 Date : श्रावण महिना संपल्यावर वेध लागतात ते भाद्रपद महिन्यातील पहिला सणाचे. हरतालिका व्रत हे वर्षाऋतूत येतं. वटसावित्री, मंगळागौर आणि हरतालिका हे व्रत महाराष्ट्रात महिलांचे आवडते आणि त्यांना समर्पित असं व्रत आहेत. त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्ये आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते, तिचा पिता दक्षप्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला होता. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वत:ला जाळून घेतलं आणि नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करुन पुन्हा ती भगवान शंकरांचीची अर्धांगी झाली. अशी ही दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता पार्वती, ही महिलांची महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करुन तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागतात. (Hartalika Teej 2024 Date shubh tithi muhurat Puja Samagri List and puja vidhi)


कधी आहे हरतालिका व्रत?


भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12.21 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.01 वाजेपर्यंत असणार आहे. तसंच हरतालिकेचं व्रत हे भाद्रपद तृतीया तिथीला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करण्यात येतं. अशामध्ये 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे असल्याने हरतालिकेचे व्रत हे 6 सप्टेंबरला आणि धर्मशास्त्रात उदय तिथीनुसार व्रत केले जाते. 


हरतालिका पूजा साहित्य


हळद-कुंकू


गुलाल


रांगोळी


नारळ


2 केळी


इतर फळं


12 विड्याची पानं


10 सुपाऱ्या


5 खारका


5 बदाम


कापसाची वस्त्रे


कापसाच्या वाती


जानवे


पंचामृत


अक्षता


निवडलेले धुवून वाळवलेले तांदुळ


अष्टगंध


शेंदूर


बुक्का


अत्तर


सुगंधी तेल


कोमट पाणी


कापूर


सुटे पैसे 


फुलं


तुळशी


दुर्वा


 उदबत्ती


सौभाग्य अलंकार 


हळदी- कुंकू, बांगड्या, गळेसरी, काजळ, कंठसूत्र



फुलं 


चाफा, केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा


पत्री


अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा, बेल 


हरतालिका पूजा विधी 


हरतालिक व्रताला 'या' गोष्टी चुकूनही करु नका!


उपवास करताना लहान-मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते. तसंच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणूनबुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका.


व्रतादिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये. उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही.


शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच सोडू नये. हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे.


शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांत असावे.


ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये. कारण हे व्रत निर्जळ करायचे असते. तसेच, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा.


हरतालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी. तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)