Importance Of Tilak In Marathi: हिंदू धर्मात टिळा लावण्याला विशेष महत्त्व आहे. टिळा न लावता ना पुजेला बसण्याची परवानगी दिली जाते वा पूजा त्याशिवाय संपन्न होतेय दोन भुवयांच्या मध्ये कपाळावर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावला जातो. त्याव्यतिरिक्त काही राज्यात गळ्यावर किंवा नाभीवरही टिळा लावला जातो. टिळा लावण्यामागे फक्त आध्यात्मिकच नाही तर काही शास्त्रीय कारणेदेखील आहेत. टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते, मन एकाग्र आणि शांत राहण्यास मदत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिळा लावणे हे हिंदू धर्मात शुभ असते पण त्यामागेही काही कारण आहेत. तसंच, टिळा लावताना काही नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. काय आहेत हे नियम जाणून घेऊया. 


1 स्नान न करता टिळा लावू नये
2 तुमचे कुलदैवत किंवा देवाला कुंकु वाहिल्यानंतरच स्वतःला टिळा लावा
3 स्वतःला टिळा लावताना अनामिकेने लावा. तर, दुसऱ्यांना टिळा लावताना अंगठ्याने टिळा लावा. 


टिळा लावण्याचे फायदे


1 चंदनाचा टिळा लावल्याने मनाची एकाग्रता वाढते
2 कुंकवाचा टिळा लावल्याने आकर्षण वाढते व आळस दूर होतो 
3 केसरचा टिळा लावल्याने यश मिळते तसंच, काम पूर्ण होतात
4 गोराचनचा टिळा लावल्यास विजय प्राप्त होतो
5 अष्यगंधाचा टिळा लावल्यास विद्या व बुद्धी मिळते


ग्रह मजबूत करण्यासाठी कोणता टिळा लावावा


सूर्य- लाल चंदनाचा टिळा अनामिकेने कपाळावर लावावा


चंद्र- सफेद चंदनाचा टिळा तर्जनीने लावा


मंगल- नारिंगी रंगाच्या शेंदूराचा टिळा अनामिकेने कपाळावर लावा


बुध- अष्टगंधाचा टिळा मधल्या बोटाने कपाळावर लावा


बृहस्पति- केसराचा टिळा तर्जनीने कपाळावर लावा 


टिळा लावण्याचे महत्त्व


धार्मिक पुराळात टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक म्हणून मानला जातो. कपाळावर टिळा लावल्याने शांती व उर्जा प्राप्त होते. टिळा लावण्याचे अनेक शास्त्रीय कारणेदेखील आहेत. टिळा लावणे आणि मानसिक शांती यांचा थेट संबंध आढळतो. आत्मविश्वास उंचावतो, मन शांत राहते, मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहते. 


काही मान्यतांनुसार, जो व्यक्ती रोज टिळा लावतो त्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही. कपाळावर टिळा लावल्याने नकारात्मक भावना येत नाहीत धैर्य कायम राहते.


हळदीचा टिळा लावण्याचे फायदे


कपाळावर हळदीचा टिळा लावण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हळदीचा टिळा लावल्याने त्वचा आणि शरीर तजेलदार राहते. कारण हळद ही बॅक्टेरियाविरोधी आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )