Holika Dahan 2023 : महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर
Holi and Rangpanchami Date 2023: यंदा होलिका दहन आणि रंगांची उधळण कधी केली जाणार याबद्दल संभ्रम आहे. कारण पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात होलिका दहन आणि रंगपंचमी वेगवेगळ्या तारखेला आहे. तर मग चला जाणून घेऊयात महाराष्ट्रात कधी हा सण साजरा करायचा आहे ते...
Holi and Rangpanchami Date 2023: होळी रे होळी पुरणाची पोळी...सुटलं ना तोंडाला पाणी...गरमा गरम पुरणाची पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार...मार्च महिना सुरु झाला आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेध लागले आहे ते होलिका दहन आणि धुलीवंदनचे...विविध रंगांची उधळण करणारा आणि नकारात्मक गोष्टींचं दहन करणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या बारावी आणि दहावीची परीक्षा सुरु आहे. त्यामुळे या रंगांची उधळण ते करणार नाहीत. पण पुरण पोळीची मजा मात्र त्यांना चाखता येणार. देशभरात साजरा होणारा हा सण उत्तर भारतात होलिकाष्टालाच (Holashtak) सुरु झाला आहे. हिंदू पंचाग आणि मराठी पंचागानुसार यंदा पूर्व भारतात आणि महाराष्ट्र वेगवेगळ्या दिवशी होलिका दहन होणार आहे. मग आपल्याकडे कधी आहे होलिका दहन (Holi Dahan Date), शुभ मुहूर्त याबद्दल जाणून घेऊयात. ( Holi 2023 Date When is holi and dhulivandan date and time in maharashtra)
महाराष्ट्रात होलिका दहन आणि धुलीवंदनाचा तारीख ( Holi 2023 Date in Maharashtra)
होळी दहन - 6 मार्च 2023 सोमवार
धुलीवंदन - 7 मार्च 2023 मंगळवार
रंगपंचमी - 12 मार्च 2023 रविवार
होळी दहनाची वेळ (Holika Dahan Date and Time)
उदयतिथीनुसार होळी दहन 6 मार्च 2023 ला भद्रा मुख आणि भद्रापुच्छ या काळात करायचं आहे. पंचागनुसार संध्याकाळी 6.24 ते रात्री 8.51 पर्यंत होळी दहनाचा मुहूर्त आहे. या होळी दहनामध्ये आपल्या मनातील आणि आयुष्यातील सगळ्या नकारामत्मक गोष्टी भस्म करायचा असतात. कोकणात होळीचा उत्सव मोठ्या थाट्यामाट्यात साजरा होतो. कोकणात या सणाला शिमगा असं म्हटलं जातं. होळीची पूजा करुन नैवेद्य दाखवून होळी दहन केलं जातं. यादिवशी पुरण पोळीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असतं.
धुलीवंदन तारीख (Dhulivandan 2022)
होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 मार्च 2023 ला एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरा करण्यात येतो. विविध रंगांची उधळण यावेळी केली जाते. तर महाराष्ट्रात काही शहरात पंचमीला रंग खेळला जातो. नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळले जातात. म्हणजे 11 मार्च 2023 ला या ठिकाणी रंगांचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
पूर्व भारतात कधी साजरा केला जाणार सण?
होळी दहन - 6 मार्च 2023 सोमवार
या राज्यात 6 मार्च ला होळी साजरी होणार
पंजाब
जम्मू, हरियाणा
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
गुजरात
मध्य प्रदेश
राजस्थान
होळी दहन
7 मार्च 2023 सोमवार
या राज्यात 8 मार्च ला होळी साजरी होणार
पूर्व उत्तर प्रदेश
बिहार
पूर्व मध्य प्रदेश
छत्तीसगढ
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)