Holi 2023: होलिका दहनच्या दिवशी करा `हे` 10 उपाय, पैसाच पैसा मिळेल!
Holi 2023, Astro tips: होलिका दहन (Holika Dahan) हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत आहुती देण्याने जीवनातील नकारात्मकता संपते, असं म्हणतात.
Holi 2023 Upay: सर्वांचा आवडता आणि रंगांचा सण म्हणजे होळी (Holi 2023). तेजस्वी आणि आनंदी वातावरणात हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात वेगळवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. होळीनिमित्त (Astro tips) अनेक जण काही ना काही उपाय करत असतात. होळीनिमित्त शास्त्रानुसार जाणून घ्या 10 उपाय! (Holi 2023 Upay successful life money remedies Astro tips holi ke totake)
होलिका दहन (Holika Dahan) कधी आहे?
होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे. यंदा होळीचा हा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. म्हणजेच 7 मार्चला होलिका दहन (Holika Dahan) असणार आहे.
होळीच्या साधारण 8 दिवसांपूर्वी होलाष्टकास (Holashtakas) सुरुवात होते. यंदा हा काळ 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अष्टक म्हणजे आठ दिवस. सहसा हा कालावधी 8 दिवसांचा असतो.
जाणून घ्या 10 उपाय (Holi 2023 Upay)
1. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा, पिठाच्या दोनमुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका. समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा.
2. कमलगट्टाची माळ घेऊन ओम महालक्ष्मीय नमः चा जप करा. होलिकाजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा.
3. मूठभर पिवळी मोहरी, एक लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते 7 वेळा उलटे करून होलिकेत जाळावं, त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो.
4. होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना 'ओम कामदेवाय विद्महे पुष्पबनाया धीमहि तन्नो अनंग प्रचोदयात' या मंत्राचा जप करा.
5. होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा, त्यामुळे कोणतंही संकट कोसळणार नाही.
6. होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा, एक बताशा, एक सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे आणून अंगावर घासून स्नान करावं, त्यामुळे फायदा जाणवू लागतो.
7. मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा, लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेत टाकावं.
8. कितीही कष्ट केलं तरीही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
9. होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या पाच लवंगा, एक बताशा, एक सुपारी अर्पण करा, त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही.
10. होलिका दहन स्थळावर पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा, त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.
आणखी वाचा - Holi 2023 : होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, आर्थिक, वैवाहिक बाबतीत होतील अनेक शुभ लाभ
होलिका दहन,धूलिवंदन आणि रंगपंचमी कधी?
होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केला जातो आणि धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी रंग गुलालाने साजरा केला जातो. तर काही भागात पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करून रंगाचा हा उत्सव साजरा केला जातो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)