Holi 2024 :  यंदाचं धुलिवंदन, होळीचा सण अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाचा असणार आहे. यावर्षी 2024 मध्ये होलिका दहन म्हणजेच धुलिवंदन 24 मार्चला फाल्गुन पौर्णिमेला साजरी करण्यात येणार आहे. तर प्रतिपदा तिथीला 25 मार्च 2024 ला रंगांची उधळण म्हणजे होळीचा सण साजरी केली जाणार आहे. यावेळी होळीच्या दिवशी अनेक शुभ संयोग आणि ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती तयार होणार आहे. होळीच्या दिवशी केल्याने पूजाने दुप्पट फायदा होणार आहे. (Holi 2024 6 Special Yogas on Holika Dahan Day Know how to get double fruits of worship)


होलिका दहन पूजेचा शुभ मुहूर्त (Holika Dahan 2024 Shubh muhurat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होलिका दहन - होलिका दहन 24 मार्च 2024 ला शुभ मुहूर्त दुपारी 11.13 ते 12.07 पर्यंत असेल. 


होलिका पूजा - होलिका दहनाच्या आधी प्रदोष काळात ही पूजा करण्यात येते. होलिकी पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 06.35 ते रात्री 09.31 वाजेपर्यंत आहे.


होळी 2024 शुभ योग


सर्वार्थ सिद्धी योग - 24 मार्च 2024 ला सकाळी 07.34 ते 25 मार्च 2024 सकाळी 06.19 वाजेपर्यंत


रवि योग - 24 मार्च 2024 ला सकाळी 06.20 ते सकाळी 07.34 वाजेपर्यंत


वृद्धी योग - 24 मार्च 2024 ला रात्री 08.34 ते 25 मार्च 2024 ला रात्री 09.30 वाजेपर्यंत 


धन शक्ती योग - होळीच्या दिवशी कुंभ राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे धन शक्ती योग निर्माण होणार आहे. या योगामध्ये पूजा केल्यास आर्थिक समस्या दूर होते. 


त्रिग्रही योग - होळीच्या दिवशी शनि, मंगळ, शुक्र कुंभ राशीत असल्याने त्रिग्रही योग असणार आहे. 


बुधादित्य योग - यावेळी होळीच्या दिवशी सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार. या योगामुळे व्यक्तीला व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात यश मिळणार आहे. 


होलिका दहन पूजा कशी करावी?


होलिका पूजेपूर्वी भगवान नरसिंहाचे ध्यान करावं आणि नंतर प्रल्हादची पूजा करा. चंदन, अक्षत आणि फुलं अर्पण करून नमस्कार करा. यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करुन करावी. पूजेत 7 प्रकारचे पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी होलिका दहन अवश्य पाहावे, ते मनातील नकारात्मकता जाळून टाकते अशी मान्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)