Chandra Grahan 2024 : महाशिवरात्रीनंतर (Mahashivratri 2024) वेध लागतात ते होळी या सणाचे. यंदा हा होळीचा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यामध्ये आहे. कारण तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. यंदा होळीचा सण हा  25 मार्चला असणार आहे. यादिवशी चंद्रग्रहण सकाळी 10:23 ते दुपारी 3:02 वाजेपर्यंत असणार आहे. पण चंद्रग्रहणाचा हा योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. होळीचा सण कोणत्या राशींसाठी वरदान ठरणार आहे जाणून घेऊयात. (Holi 2024 Lunar eclipse on Holi after almost 100 years Golden time will start for the people of this zodiac sign)


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. होळी आणि चंद्रग्रहण तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. तसंच, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहात. या कालावधीत तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तसंच, तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आबहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नातं टिकवण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहे. चंद्रग्रहणानंतर तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे.


कर्क रास (Cancer Zodiac)   


कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आणि होळीचा सण अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करणार आहात. तसंच, यावेळी तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणाशी सकारात्मक ठरणार आहे. तुम्ही कामासाठी प्रवास करणार आहात. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होणार आहे. याशिवाय व्यावसायिकांनाही त्यांच्या कामात अनुकूल परिणाम मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त


कन्या रास (Virgo Zodiac)   


कन्या राशीच्या शुभ दिवसांची सुरुवात चंद्रग्रहण आणि होळी सणापासून होणार आहे. यावेळी बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहे. तुमचं व्यक्तिमत्वही सुधाणार आहे. तसंच त्याचा प्रभाव तुमच्या बोलण्यात दिसून येणार आहे. ज्यामुळे लोक तुमच्यापासून प्रभावित होणार आहे. त्याच वेळी, तुमच्या जोडीदाराशी तुमचं संबंध खूप चांगले होणार आहे. तसंच, यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)