होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?
Holi 2024 : हिंदू धर्मात होळीचा सण प्रमुख सणांपैकी एक असून त्याला अतिशय महत्त्व आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं.
Holi 2024 Cow Dunk Burn Benefits: होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे. आध्यात्मिक कथेनुसार हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्र प्रल्हादच्या विष्णूभक्तीमुळे त्रस्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादला मारण्याची जबाबदारी बहीण होलिकेला दिली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसली. विष्णूने प्रल्हादाला वाचवलं आणि होलिकाचं दहन झालं. त्या काळापासून होलिका दहन हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. (Holi 2024 Why are cow dung cake burnt on holika dahan What is the religious significance behind this)
होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात?
हिंदू धर्मात गायीला मातेसमान महत्त्व असून गायीमध्ये 33 कोटी देव-देवतांचे वास्तव्य असतो असं म्हणतात. त्यामुळे हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. गायीसोबत तिचं गोमूत्र आणि शेणही पवित्र मानलं जातं. शेणाच्या गोवऱ्या या हिंदू धर्मात धार्मिक विधीमध्ये वापरल्या जातात. असं म्हणतात की, शेणाच्या गोवऱ्या जाळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेहावर शेणींची चित्ता रचली जाते. जेणेकरुन त्या व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा अग्नीमध्ये भस्म होते, अशी धार्मिकशास्त्रात मान्यता आहे.
याशिवाय धार्मिक कार्यात म्हणजे होम हवनमध्ये शेणी जाळण्याची परंपरा आहे. धार्मिक शास्त्रात शेणाच्या गोवऱ्या वापल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. नकारात्मक ऊर्जेचा नष्ट होऊन आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढते. होळीच्या दिवशी म्हणजे होलिका दहनला शेणाच्या गोवऱ्या जाळण्यामागे धऱ्मशास्त्र सांगते की, तुमच्या आजूबाजूची सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो, रोगांचाही नायलाट होतो, अशी मान्यता आहे.
शेणाच्या गोवऱ्यामधून निघणारा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करतो, असं म्हटलं जातं. तसंच, हानिकारक जीवाणू देखील नष्ट होतात. शेणाच्या गोवऱ्या जाळल्यामुळे धूर निर्माण होतो त्यातून वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)