Holika Dahan 2024 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यंदा होलिका दहन येत्या रविवारी 24 मार्चला असणार आहे. देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. होलिका दहन हे वाईटवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपर्ण मानली जाते. पण तुम्हाला कधी विचार केला का की, होलिका दहनाच्या वेळी नारळ का अर्पण करतात? (Why is coconut offered in Holi How to offer it Find out what astrologers say astrology tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष अभ्यासक सचिन मधुकर परांजपे यांनी श्रीफळ का अर्पण करतात आणि होळीत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत याबद्दल सांगितलं आहे. 


होळीत श्रीफळ का अर्पण करायचं? 


नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. दक्षिण भारतात नारळाला हरा सोना म्हटलं जातं. होलिका दहनाचे अग्नि अत्यंत पवित्र आध्यात्मकमध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे. होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्तसाठी होतो अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. 


अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते. कर्जाचा बोझा दूर होतो. त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्याने ते व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतो. होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागतात असं म्हणतात. 


होळीत नारळ अर्पण विधी, मुहूर्त आणि मंत्र 


पंचांगानुसार 24 मार्च 2024 ला रात्री 11.31 वाजेपासून रात्री 12.27 वाजेपर्यंत पूजा करता येणार आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून, धरण्याची पद्धत शेंडी बाहेरच्या बाजूने असावी. हे नारळ घरातून फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करावे. होळी दहनाचा मुहूर्तावर तो अर्पण करावा. जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा. एक गोष्ट लक्षात ठेवा हा नारळ फिरवताना खाली मंत्राचा जप करावा. 


“ॐ सर्वाबाधा-विनिर्मुक्तो, धनधान्यसुतान्वितः।
मनुष्यो मत्प्रसादेन् भविष्यति न संशयः।।”


हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार 11/21/108 वेळा करु शकता. या उपायाने घरातील रोगराई, नकारात्मकता नष्ट होते. 


हेसुद्धा वाचा - Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)