Numerology Holi 2024 Tips in Marathi : ज्योतिषशास्त्रानुसारच अंकशास्त्र हे ग्रह आणि अंकाशी निवडत आहे. प्रत्येक ग्रहाचा आपल्या एक रंग असतो. त्यामुळे तुमच्या जन्मतारखेनुसार असलेल्या विशेष मूलांकसाठी होळीचा कुठला रंग सकारात्मक आहे. शिवाय होळीच्या दिवशी काय करावं ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखकारक होईल याबद्दल एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. अंकशास्त्रानुसार 3, 12, 21, 30 या तारखेला ज्यांचा वाढदिवस आहे त्या लोकांचा मूलांक हा 3 असतो. (Holi Numerology Tips What should 3 12 21 30 birthday people do on Holi 2024)


3 मूलांक असलेल्या लोकांनी कुठल्या रंगांनी होळी खेळावी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकशास्त्रानुसार मूलांक 3 हा देवगुरू बृहस्पतिशी संबंधीत आहे. गुरु हा तुमचा कारक असल्याने होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळ्या पहिले घरातील देवघर किंवा पूजास्थान स्वत: स्वच्छ करा. 3, 12, 21, 30 या जन्मतारखेच्या लोकांनी होळीच्या दिवशी पूजा स्थान किंवा मंदिर पवित्र केल्यानंतर तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा.


हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?


त्यानंतर तुमच्या गुरु आणि घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्या. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे हळू हळू दूर होतील. एवढंच नाही तर तुमच्या कामात यश मिळेल. 


हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?


यानंतर होळीचा उत्साह लुटण्यासाठी सज्ज व्हा. गुरुचा रंग हा पिवळा असतो. त्यामुळे या होळीला तुम्ही तुमच्या गुरुच्या रंगात म्हणजे पिवळ्या रंगात रंगून जा. या लोकांनी होळीच्या दिवशी पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. तर पिवळा, पांढरा आणि नारंगी रंगासोबत होळीचा आनंद घ्या. या रंगाशिवाय तुम्ही लाल, गुलाब आणि जांभळ्या रंगाचा वापर करु शकता. 



या लोकांनी काळा रंग घालू नयेत. ही लोक खूप चांगली सल्लागार असतात. या लोकांजवळ सगळ्या प्रकारच्या समस्येवर मात करण्यासाठी मार्ग असतो. या लोकांनी होळीच्या दिवशी लोकांना चांगल्या सल्ला द्यायचा आहे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवायचा आहे. त्याशिवाय होळी खेळून झाल्यानंतर आंघोळ करायला जाल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात दोन चुटकी हळद घ्यायला विसरु नका. या उपायामुळे तुमचं लकी मजूबत होईल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)