मेष- आज तुम्ही एखादी गोष्ट निकालात निघण्याच्या प्रतिक्षेत असाल तर, शांतता राखा. सारंकाही ठीक होणार आहे. मेहनत करा, यश मिळेल. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या म्हणण्याचा अनेकांवर प्रभाव होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तणाव असेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. घरगुती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती तुमच्या कलाने असेल. मित्रांकडून वेळेवर मदत मिळेल. 


मिथुन- दैनंदिन कामं पूर्ण होणार आहे. पण, त्यासाठी जास्तीची कामं आणि मेहनत करावी लागेल. आज शांतता राखा. तुमच्यावर विविध प्रसंगांमुळे आनंदाची बरसात होणार आहे. सकारात्मक दृष्टीकोन फायद्याचा ठरेल. 


कर्क- पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या वेळेतही एखादं काम करण्यासाठी पुढाकार घ्या. जुन्या कामांच्या मुद्द्यावरुन एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. पण, ते क्षणिक असतील. 


सिंह- आज कोणत्याही कामाची टाळाटाळ करु नका. नोकरीवर पूर्ण विश्वास ठेवा. एकाग्रतेने कामं पूर्ण करा. कुटुंबाची साथ मिळाल्यास वेळ कसा व्यतीत होईल हे कळणारही नाही. मनावर ताबा ठेवा. 


कन्या- दिवस चांगला आहे. भावनांवर ताबा ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळेल. पण, सहकाऱ्यांसोबतची तुमची वागणूक चांगली ठेवा. मानसिक संतुलनामध्ये संतुष्टता असेल. 


तुळ- आज तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न कराल. अडकलेली कामं पूर्ण होतील. कामात मन लागेल. एखाद्या धार्मिक प्रवासावर जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 


वृश्चिक- अनेक कामं अतिशय सहज पद्धतीने पूर्ण होतील. ज्या अडचणी आहेत त्यांच्यावर तोडगा काढाल. कायदेशीर कामांवर लक्ष द्या. मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. 


धनु- गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टींचा बेत आखत होतात, ती कामं आज पूर्ण होणार आहेत. तुमच्या वाणीनेच सर्व कामं पूर्ण होणार आहेत. स्वत:वर विश्वास ठेवा. 


मकर- बेरोजगारांना आज रोजगाराच्या संधी मिळतील. ज्या अडचणी आहेत या अगदी सहजपणे पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. अडकलेले पैसे परत मिळतील. दिवस आनंदी असेल. 


कुंभ- आजचा दिवस सर्वसामान्य आहे. भावनात्मक गोष्टींवर इतरांशी संवाद साधू शकता. तुम्हाला इतरांची मदत मिळेल. जुन्या कामांना वेग मिळेल. एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. 


मीन- दैनंदिन कामांमध्ये यश मिळणार आहे. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. मानसिकदृष्ट्या बरेच सक्रिय असाल. कामाची पद्धत सुधारण्यावर भर द्या.