Horoscope 14 March 2023 Rashi Bhavishya : ज्योतीष शास्त्रात राशी भविष्य खूप महत्वाचे असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी या राशी भविष्यावर अवलंबून असतात. यामुळे बरेच जण राशीभविष्य जाणून घेवून दिवसाची सुरुवात करतात. 14 मार्च हा दिवस कसा असेल जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.


मेष (Aries) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान सन्मान वाढेल. आरोग्याची चिंता दूर होईल. नोकरीत यश मिळेल. गुळ दान म्हणून द्या. शुभ रंग लाल


वृषभ (Taurus)


अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे मिळतील. जुनी इच्छा पूर्ण होईल. कामाच्या नवीन संधी मिळतील. शिव मंत्राचा जप करा. शुभ रंग निळा.


मिथुन (Gemini)


आरोग्याशी निगडीत समस्या दूर होतील. शेजाऱ्यांशी असलेले वाद दूर होतील. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्या. भावंडाची सोबत मिळेल. शुभ रंग मरून.


कर्क (Cancer)


प्रेम प्रकरणात यश मिळेल. एखाद्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास सकारात्मक बदल दिसेल. मान सम्मान वाढेल. परिवाराची सोबत मिळेल. शुभ रंग पांढरा. 


सिंह (Leo)


डोकेदुखीचा त्रास होईल.  कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आई वडिलांचा सन्मान करा. मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्या.  शुभ रंग नारंगी.


कन्या (Virgo)


मनात नकारात्मक विचार येवू देऊ नका. दिवसभर कामात व्यस्त रहाल. कौटुंबिक वाद विवाद संपुष्टात येतील. न्यायलयात खटला सुरु असल्यास यश मिळेल. शुभ रंग चंदेरी. 


तूळ (Libra)


वडिलांकडून अचानक भेट वस्तू मिळेल. नोकरी बदलण्याचा निर्णय विचार पूर्वक घ्या. पैशाची अडचण दूर होईल. आपली महत्वाची कागदपत्रे नीट सांभाळून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग राखाडी.  


वृश्चिक (Scorpio)


व्यापाऱ्यांनी पैसे उधार देणे टाळावे. नविन ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते. बेजबाबदारपमे वागू नका. शुभ रंग पिवळा. 


धनु (Sagittarius)


मित्राची प्रकृती बिघडू शकते. महत्वपूर्ण कामाचा निश्चित फायदा होईल. जवळच्या व्यक्तीचा अपमान होईल असे वागू नका.  शुभ रंग आकाशी


मकर (Capricorn)


व्यापारात भांडण करु नका. अचानक जुना मित्र भेटेल. नविन लोकांशी मैत्री टाळा. मनाची इच्छा पूर्ण होईल. शुभ रंग आकाशी. 


कुंभ (Aquarius)


आपले काम जबाबदारीने पूर्ण करा. नोकरीची समस्या दूर होईल. नोकरी बदलण्याचा निर्णय घेवू नका.  शुभ रंग गुलाबी


मीन (Pisces)


व्यापाराची चिंता दूर होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. नशिबावर विश्वास ठेवा. गुळ आणि चने दान करा. शुभ रंग सोनेरी.