Horoscope : या 5 राशींवर होणार पैशाचा पाऊस, कसा असेल आजचा दिवस?
असा असेल आजचा दिवस
मुंबई : विशेष करून आज भगवान गणेशची आराधना करावी. ज्योतिषाचार्य बेजान दारूवाला यांचे पुत्र चिराग दारूवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गणरायाची आराधना करावी. यामुळे कार्यात सफलता मिळेल.
मेष : आत्मविश्वास वाढेल. ग्रॉसरीशी संबंधित व्यवसायात असाल तर तुमचा फायदा होईल. ऑफिसमधील वातावरण तुमच्या बाजूने असेल. नवविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल.
वृषभ : सकाळपासूनच तुम्ही प्रसन्न अशाल. कामाकडे पूर्ण लक्ष्य द्या. सॉफ्टवेअरशी संबंधित असलेल्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. आर्थिस स्थिती बदलेल.
मिथुन : वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला चांगला अनुभव देईल. व्यापाराची परिस्थिती ठिक ठाक असेल. वर्तमान परिस्थितीत संयम अतिशय महत्वाचा आहे. नातेवाईकांकडून मदत मिळेल.
कर्क : निर्णय घेताना सगळ्यांच्या मतांचा विचार करा. नोकरीमध्ये स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा. कामात प्रगती होईल.
सिंह- आपला आजार बरा होऊ शकतो. पैसे आणि आपल्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आज खूप जपून ठेवा. आज आपल्या राशीचे ग्रह चांगले नाहीत त्याचा परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. नियोजन करून कार्य करा.
कन्या- करमणुकीसोबत खेळाचा समावेश केला तर दिवस उत्तम जाईल. आज पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. आज आपल्या प्रेमाला एक सुंदर वळण मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.
तुळ- सकारात्मक विचार करा. ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. आज खूप कसरत करावी लागू शकते.
वृश्चिक- विश्रांती घेण्यासाठी आज वेळ मिळेल. आपल्या दृढ आत्मविश्वासामुळे काम सोपं होईल. आजची संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत जाईल.
धनु- आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. आज आपल्याला ताण येऊ शकतो. कर्जाची परतफेड आजच करा. वाद आणि टीकेचा सामना करावा लागेल.
मकर- चांगल्या गोष्टी स्वीकारण्याकडे आज आपला कल असेल. जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. आज खर्चावर नियंत्रण न राहिल्यानं बजेट कोलमडेल.
कुंभ- मानसिक ताण आणि कटकटीपासून दूर राहा. आज आर्थिक चणचण जाणवू शकते. मित्रांकडून योग्य सल्ला मिळेल. नव्यानं प्रेमात पडण्याची सवय धोक्याची ठरू शकते.
मीन- आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपल्याला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज आपलं मन लागणार नाही.