Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे. 


मेष: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या व्यक्तींना प्रभावशाली लोकांचे सानिध्य आणि मार्गदर्शन मिळेल. ज्यामुळे तुम्ही खूप काही चांगल शिकू शकता. आई वडिलांच्या तब्येतीमुळे चिंतेचे वातावरण असू शकते. 


वृषभ:


आपल्या पदाचा गर्व करु नका. अन्यथा जे लोक तुमचा आदर करतात ते तुम्हाला तिखट उत्तर देतील. उधारी दिलेले पैसे परत मिळाल्याने कामांना गती मिळेल. पैसे नवे स्टॉक घेण्यास खर्चदेखील करु शकता.जोडीदाराच्या महत्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागू शकते. 


मिथून:


ग्रहांची स्थिती पाहता या राशीच्या लोकांचे मनोबल कमी होण्याची शक्यता आहे. हे ऊंचावण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ऐका. कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांना सरकारी कामे मिळण्याची शक्यता आहे. तरुणांनी नेट बॅंकींग आणि क्रेडीट कार्डचा उपयोग संभाळून करा. 


कर्क: 


या राशीच्या लोकांचे नोकरीत कौतुक होण्याची शक्यता आहे. असेच मन लावून काम करत राहा. व्यापारी वर्गाने नियम आणि अटींचे पालन करुन काम करा. गैर मार्गाचा वापर करणे टाळा.तब्येतीची काळजी घ्या. 


सिंह: 


या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातून अहंकार दिसू शकता. लवकरच दूर करा अन्यथा तुमचे संबंध खराब होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी ब्रम्ह मुहुर्ताला उठून अभ्यास करा. 


कन्या:


उर्जेला क्रोधात खर्च करु नका. याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. ग्रहांची स्थिती पाहता व्यवसायात फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा आणि तब्येतीची काळजी घ्या. 


तूळ:


मार्केटिंग संबंधी काम करत असाल तर संपर्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होईल.श्वास घेण्यास त्रास, गोंधळून जाणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. 


वृश्चिक:


कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.तरुणांनी पैशाचा सदुपयोग करा. ज्यांच्या बोलण्याने वातावरण प्रभावित होते, अशा व्यक्तीचे घरात आगमन होऊ शकते. 


धनू:


कामाच्या ठिकाणी स्थिती अनुकूल असल्याने तुमचे लक्ष केंद्रीत राहीलं. काही कारण नसताना दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करु नका. अन्यथा दुसऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. 


मकर:


मकर राशीच्या लोकांना थोडं ऐकून घ्याव लागू शकतं. अशा लोकांशी जेवढ्यास तेवढा व्यवहार ठेवा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. सर्दी-खोकला असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका. 


कुंभ:


या राशीच्या व्यक्तींना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळून फायदा होईल. नवी संधी आली तर त्याचा स्वीकार करा. पितरांना नमस्कार करुन घरच्या सदस्यांचा आशीर्वाद घ्या. 


मीन:


वरिष्ठ पदावर काम करणाऱ्यांना थोडा कडक व्यवहार करावा लागू शकतो. व्यापारी वर्ग व्यस्त असेल. वेगळे होण्याचा विचार केलेल्या दाम्पत्याने पुनर्विचार करावा आणि आपल्या नात्याला आणखी एक संधी द्यावी.