मुंबई- प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसात आपले ग्रह चांगले आहेत की वाईट याची जर आपल्याला पूर्व कल्पना मिळाली तर समस्या टाळणं किंवा त्याचा सामना करणं अधिक सोपं होऊन जातं. त्यासाठीच जाणून घ्या 17 मार्चचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- आरोग्य चांगलं असेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आपला आजचा दिवस चांगला आहे. कोणतीही जोखीम स्वीकारू नका. 


वृषभ- आज आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आरोग्याच्या कुरबुरी असतील. प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल. 


मिथुन- आपली स्थिती तशी बरी असेल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र असणार आहे. सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे. 


कर्क- आज आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात. कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या. प्रेमाच्या परिस्थितीमध्ये थोडी सुधारणा होईल. 


सिंह- आजचा दिवस तसा खराब नाही मात्र स्वत:ची काळजी घ्या. आज आपल्याला थोडे परिश्रम आणि कटकटीचा सामना करावा लागू शकतो. 


कन्या- आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 


तूळ- घर-कुटुंबाकडे आज लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याला समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 


वृश्चिक- आज परिस्थिती चांगली राहिल. आरोग्य आणि प्रेम दोन्हीची स्थिती चांगली राहणार आहे. 


धनु- आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बोलताना विशेष काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.


मकर- आज आपल्याला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 


कुंभ- काही गोष्टींना घेऊन आज विशेष काळजीत असाल. गणपतीची पूजा करा त्यातून आज आपलं मन शांत आणि प्रसन्न राहिल.


मीन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. हळू-हळू विचार करून निर्णय़ घ्या यश नक्की मिळेल.