मेष - धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूवर मात कराल. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. प्रगतीचा योग आहे. मित्रांची मदत मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर चांगला परिणाम होणार आहे. कुटुंबाचं समर्थन मिळेल. एखादा असा प्रवास घडेल ज्याचा फायदा तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. जुने वाद मिटतील. 


मिथुन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही नवे मित्र मदत करतील. परिस्थिती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. 


कर्क- करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्याचीच संधी तुम्हाला असेल. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. ज्या गोष्टींकडे अडचण म्हणून पाहत आहात त्याच गोष्टी तुमच्यासाठी पुढं फायद्याच्या ठरणार आहेत. 


सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. काही मित्रांची नकळत मदत होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होतील. नवी जबाबदारी मिळेल. 


कन्या- तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वसामान्य असेल. देवाणघेवाणीचे व्यवहार होतील. आजुबाजूला बराच गोंधळ असेल. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल. मेहनत करण्यासाठी तयार राहा. 


तुळ- तुमची कामं अडकणार नाहीत. संकोचलेपणा दूर ठेवा. कामावर लक्ष द्या. इतराच्या गरजांवर लक्ष द्या. 


वृश्चिक - पद, वेतन या बाबतीत तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. काही गोष्टी मनामसारख्या होणार नाहीत. पण, त्यानं खचून जाऊ नका. पैशांसाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. 


धनु- महत्त्वाच्या व्यक्तींशी मेळ साधाल. एखादी नवी जबाबदारी मिळेल. काही अडचणी अगदी सहजपणे दूर होतील. 


मकर- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगले संकेत मिळतील. एखाद्या व्यक्तीची मोलाची मदत होणार आहे.

कुंभ- जुने संबंध दृढ करण्याची संधी मिळेल. जास्तीची कामं हाती घेण्यापूर्वी पूर्वीपासून असणाऱी जबाबदारी लक्षात घ्या. 


मीन- जीवनात एखादा महत्त्वाचा बदल होईल. अडचणी दूर होतील. एखादी नवी योजना आखाल. वेळेला महत्त्वं द्या.