मुंबई : आज गुरूवार सत्य नारायण देवाची आराधना करावी. सत्य नारायणाची उपासना केल्याने भाविकांचे दारिद्र दूर होते. या दिवशी सत्य नारायणाचा कडक उपवास करावा आणि कथा ऐकावी. यामुळे देव प्रसन्न होतील. आजच्या दिवशी  गुरु बृहस्पति देवाची उपासना करावी. तुमच्या भाग्याचे सितारे चमकतील. आजच्या 12 राशींचं भविष्य जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- आजचा दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. 


वृषभ- कुटुंबाची साथ मिळेल. तुमच्या वाणीवर मात्र ताबा ठेवा. कोणा एका कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलावणं येणार आहे. दूरच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद घडण्याचा योग आहे. 


मिथुन- तुमच्या आवडीची कामं करण्यासाठी उत्सुक असाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. विचार मात्र सकारात्मक ठेवा. 


कर्क- तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर असेल. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी आहे. काही सकारात्मक बदल घडतील. 


सिंह- वेळ तुमच्या कलानं आहे. समाजिक स्तर उंचावेल. तुमच्या म्हणण्याला प्राधान्य देण्यात येईल. न्यायालयीन कामं मार्गी लागतील. 


कन्या- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल. 


तुळ- समोर येणाऱ्या प्रत्येक संधीलर लक्ष ठेवा. तुमची कामं अडणार नाहीत. एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरु होईल. इतरांच्या गरजाही लक्षात घ्या. 


वृश्चिक - कोणा एका नव्या स्थानावर भेट देण्यासाठी जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधार येतील. आर्थिक कारणास्तव एखादा प्रवास करावा लागू शकतो. 


धनु- आर्थिक स्थितीचा विचार करा. तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल. काही अडथळे दूर होतील. कुटुंबात एकी राहील. 


मकर- जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष द्या. व्यापार आणि नोकरीवर लक्ष द्या. पुढे जाण्याच्या संधी आहेत. मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळेल. 


कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल. 


मीन- कुटुंब आणि मित्रपरिवाराची साथ मिळाल्यामुळं अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. अधिकाधिक गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.