मुंबई : बुधवारी सिंह राशीच्या लोकांना व्यापारामध्ये चांगलं फळ मिळेल. मात्र दुसरीकडे तूळ राशीच्या व्यापाऱ्यांना सरकारी नियमांमुळे काही त्रास होऊ शक्यता आहे. जाणून घ्या काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यातील पहिल्या बुधवारी तुम्हाला चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही नवीन आणि मोठे निर्णय घेऊ शकता. तसंच तुमचा व्यवसाय आणि नोकरी यामध्ये चांगलं काम करण्याची शक्यता आहे. 


वृषभ (Taurus)


बुधवारी तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. व्यवसायात अचानक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुमचं म्हणणं मांडण्याची हीच योग्य वेळ आहे.


मिथुन (Gemini)


बुधवारचा दिवस तुमच्यासाठी विशेष असणार आहे. तुमच्या मनात काही गोष्टी असतील तर त्या तातडीने व्यक्त करा. शिवाय प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत जास्त विचार करण्याची गरज आहे. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.


कर्क (Cancer)


बुधवार तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तसंच, तुम्ही भविष्य लक्षात घेऊन गुंतवणूक करू शकता. तुम्हाला नोकरीतही यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.


सिंह (Leo)


या बुधवारी कोणाचेही शब्द मनावर ठेवू नका. नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. व्यवसायात चांगले परिणाम प्राप्त होतील. 


कन्या (Virgo)


बुधवारी तुमची बरीच कामं मार्गी लागू शकतात. तुमच्या वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करण्याचा योग आहे.


तूळ (Libra)


या बुधवारी कामामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. सरकारी नियमांमुळे बिझनेसच्या काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे नवे मित्र बनतील.


वृश्चिक (Scorpio)


बुधवारी अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकतं. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत. 


धनु (Sagittarius)


बुधवारी सकारात्मक विचारांनी तुमच्या कुटुंबीतील व्यक्ती खूश होतील. बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी लाभाचा काळ आहे. प्रलंबित असलेला व्यवहार फायदेशीर वाटेल.


मकर (Capricorn)


बुधवारी तुम्हाला काही नवीन काम केल्यासारखं वाटेल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. 


कुंभ (Aquarius)


बुधवारी एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या अनेक चांगल्या संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. 


मीन (Pisces)


बुधवारी स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांच्या मदतीने तुम्ही कठीण कामं सहज पूर्ण कराल. तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीप्रमाणे यश मिळेल.