मुंबई : रविवारी तुम्हाला आनंदाची बातमी कानी पडेल. मिथुन राशीच्या लोकांनी यश मिळवण्यासाठी योग्य प्रयत्नशील असावे. तुळ राशीच्या लोकांनी वादापासून दूर राहावे. कुंभ राशीच्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे बंद करा. संयम ठेवा. पाहूया कसा असेल आजचा रविवार. (Horoscope 20 February 2022 Sunday Astrology Todays Zodiac Sign) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. कोर्टातल्या गोष्टींपासून दूर राहा. 


वृषभ : तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. 


मिथुन : स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या स्वभावामुळे नात्यात विश्वास निर्माण होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत लोकांकरता शुभ दिवस. 


कर्क : तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल. 


सिंह : दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका. धनप्राप्त होणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. कामात यश प्राप्त होईल. 


कन्या : रविवार आज भरलेला असेल. मन प्रसन्न राहिल. वरिष्ठांकडून मदतीची साथ मिळेल. आजचा दिवस खूप खास आहे. 


तूळ : दुसऱ्या लोकांसोबत राजकारणात जाण्याचा प्रयत्न कराल. मनात काही तरी नवं आणि खास करण्याचा प्रयत्न असेल. आजचा दिवस मेजवाणीचा दिवस आहे. 


वृ्श्चिक : आज तुम्हाला कुटुंबात खूप महत्व आहे. धनलाभ होणार आहे. शिक्षणात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे. विवाहितांना संतती सुख लवकरच मिळेल. 


धनू : दिनचर्येत मोठा बदल करा. तुमची आवड आज तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार आहे. नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा. 


मकर : नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास ठरेल. रिअल इस्टेट लोकांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. 


कुंभ : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. 


मीन : आजचा दिवस उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची सुवर्णसंधी. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक बांधिलकी जपाल. कुटुंबाकडून सकारात्मक विचार तुमच्यासोबत असतील याचा अनुभव येईल.