मुंबई : सोमवारी तुमचा दिवस हा कामकाजाचा असणार आहे. प्रत्येक कामात आज फक्त यश अनुभवाल. घरी पाहुण्यांची रेलचेल असेल. नोकरदारवर्गासाठी महत्वाचा दिवस, वरिष्ठांकडून कौतुक होईल. मकर राशीच्या लोकांचा कुणासोबत तरी वाद होऊ शकतो. (Horoscope 21 February 2022 Monday  Astrology Todays Zodiac Sign) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : दिवसाची सुरूवात अतिशय चांगली होणार आहे. आज ते काम हाती घ्याला त्यामध्ये यशच मिळेल. दुसऱ्यांसोबत काम करताना लाभ होणार आहे. आरोग्य उत्तम राहिलं. दुसऱ्यांसोबत व्यवहार चांगला राहिल. 


वृषभ : चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल. ज्याचा फायदा तुम्हाला कामात होणार आहे. नवीन मित्र भविष्याच्या उज्वल दिवसांचे साक्षीदार ठरणार आहे. भाग्यसोबत आहे. संबंध चांगले ठेवा. 


मिथुन : आपल्यापासून मोठ्या व्यक्तींचा आदर करा. भाग्याचा दिवस आहे. यश तुमच्याहाती. प्रेम संबंधात संवेदनशील राहा. विचार करून बोला. 


कर्क : सोमवारचा दिवस महत्वाचा यश प्राप्त होणार. तुमची मेहनत आणि नशिबाची सुंदर साथ असेल. आर्थिक स्थिती बदलणार आहे. आरोग्य उत्तम राहिल. 


सिंह : तुमचं भाग्य चांगलं आहे. मित्र आणि जवळच्यांना चांगला वेळ द्याल. व्यावसायिक योजना आखाल. वेळ चांगली आहे. 


कन्या : तुमचा व्यवहार अतिशय सौम्य असेल. व्यवहार, परिवर्तन यासारख्या विषयांवर चर्चा कराल. कामात मग्न राहाल. धनलाभ होणार. 


तूळ : सोमवारी उत्साहात आपल्या कामाला सुरूवात कराल. विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस आहे. नोकरदारवर्गाला आज वरिष्ठांची मदत मिळणार आहे. मन प्रसन्न राहिल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक : तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात चांगला दिवस असेल. घरी पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे. वातावरण अधिकच प्रसन्न आहे. 


धनू : तुमची बुद्धीमत्ता आणि चतुराई याचा सुंदर मेळ आज पाहायला मिळेल. आपल्या कामाने वरिष्ठांना आनंद द्याल. मंगलकार्य घरी घडणार आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. 


मकर : उगाचच कुणावर रागवू नका. आरोग्य उत्तम राहिल. शरीरात उत्साह असेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. दाम्पत्यासाठी आजचा दिवस खास आहे. 


कुंभ : आज तुमच्या शत्रुसोबतही चांगला व्यवहार करा. यश प्राप्त होणार आहे. मित्र आणि परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. सोमवारी स्वास्थ देखील उत्तम असेल. 


मीन : कामकाज अतिशय उत्तम असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिले. चतुराईने वागणं अत्यंत महत्वाचं आहे. यश प्राप्त होईल. नोकरदार वर्गासाठी आजचा  दिवस महत्वाचा.