मेष - कोणा एका गोष्टीच्या निकालाची प्रतिक्षा असल्यास तो निकाल लवकरच हाती येणार आहे. शांततेनं पुढे जा. सर्वकाही सुरळीत होईल. मोठा फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर मोठा प्रभाव असणार आहे. तणावाच्या गोष्टींपासून दूर राहा. मित्रांची वेळीच मदत होणार आहे. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. 


मिथुन- दैनंदिन कामं आटोपण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागणार आहे. तुमची जबाबदारी सांभाळण्यावलर लक्ष द्या. शांतता राखा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. 


कर्क- कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करु नका. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह- पैसे कमवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे. जास्तीची कामं करावी लागणार आहेत. एखादी शुभवार्ता मिळेल. 


कन्या- आजचा दिवस चांगला आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक कामं वेळीच पूर्ण होतील. मानस्थिक स्थैर्य लाभणार आहे. 


तुळ- धैर्यानं काम करा. चांगल्या व्यवहारांमुळं तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. काही खास कामं आटोपण्यात मात्र अडचण येऊ शकते. 


वृश्चिक- अनेक कामं अधिकाधिक सोप्या पद्धतीनं पूर्ण करु शकाल. मेहनत करा. मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. साथीदाराची मदत मिळणार आहे. 


 


धनु- आज अनेक कामं पूर्ण होणार आहेत. बेत आखून पुढची पावलं उचला. स्वत:वर विश्वास ठेवा. हा महिना तुमच्या जीवनात सकारात्मकता आणणार आहे. 


मकर- बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अडचणीच्या प्रसंगी अनेकांची मदत होणार आहे. मोठी पावलं आणि निर्णय घेताना दुसऱ्यांदा विचार करु नका. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 


कुंभ- दिवस सर्वसामान्य असेल. अडचणीतून सावराल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या कामांमध्ये वेग येईल. एखादी शुभवार्ता मिळेल. यंदाचा श्रावण मास तुमच्यासाठी फलदायी असेल. 


मीन- कोणा एका व्यक्तीच्या साथीनं दैनंदिन कामं पूर्णत्वास जाणार आहेत. आजचा दिवस व्यग्र असेल. नवी जबाबदारी तुमच्या खांद्यांवर येणार आहे. कामकाज पूर्ण करण्याच्याच दृष्टीनं पावलं उचला.