मुंबई: सोमवार काही राशींसाठी आनंद तर काही राशींसाठी समिश्र स्वरुपाचा असणार आहे. काही राशींच्या कुटुंबात अस्थिरता असणार आहे. तर काही राशींना कामातही अडथळे येणार आहेत. जाणून घेऊया खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा खगोल मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून 12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: व्यापाऱ्यांसाठी खूप चांगला दिवस असणार आहे. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांचं कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. 


वृषभ: कुटुंबात वैचारिक मतभेद असणार आहेत. प्रेमासाठी शुभ दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. 


मिथुन: आपल्या चांगल्या कामाने दुसऱ्यांना प्रभावित कराल. व्यावसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अडकलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. 


कर्क: आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. वेळेत आपलं काम कसं पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. 


सिंह: आरोग्याच्या समस्या जाणवणार आहेत. भावनेच्या आहारी जाऊ नका. कुटुंबातील अशांतता आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. 


कन्या: व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्याला वरिष्ठ किंवा ज्येष्ठांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. 


तुळ: कोणत्याही नव्या कामासाठी सोमवारचा दिवस चांगला ठरणार आहे. आपण हाती घेतलेलं काम यशस्वी होईल. 


वृश्चिक: आपल्या जीवनशैलीत बदल करा. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याकडे कल असेल.


धनु: कामगारांसाठी दिवस चांगला असणार आहे. सोमवारचा दिवस आपल्यासाठी अशुभ ठरू शकतो. 


मकर: भाग्य आपली साथ देणार आहे. कामामध्ये आपल्याला यश मिळेल. प्रवासाचा योग आहे. 


कुंभ: आपल्यासाठी दिवस आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण असणार आहे. आपल्या मेहनतीचं फळ मिळेल. दिवस आनंदाचा असणार आहे. 


मीन: आपल्यासाठी सोमवारचा दिवस चिंतेचा विषय असणार आहे. अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.