मुंबई : आज फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे. आज सिंह राशीच्या लोकांच्या मनात आदर असेल. समोरच्या व्यक्तीला प्रेमाने स्वीकारा. तर तूळ राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार सांभाळावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : शुक्रवार महिलांसाठी असेल खास आणि शुभ. राजकारणाशी संबंधित व्यक्तींकरता आजचा दिवस महत्वाचा. पैशांबाबत आज तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळणार आहेत. 


वृषभ : शुक्रवारी तुम्ही तुमचं धैर्य गाठाल. तुमची मेहनतं तुम्हाला समृद्धीकडे नेणार आहे. पैशाबाबत आज थोडं सतर्क राहा. 


मिथुन : आजचा दिवस खूप खास आहे. आजचा शुक्रवार तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. धनाची बचत करा. फूड इंडस्ट्रीशी संबंधित असेलल्या लोकांचा चिंता वाढणार आहे. 


कर्क : या शुक्रवारी तुम्हाला सगळ्यांकडून मदत मिळेल. कामाचा दिवस असेल. यश देखील सहज प्राप्त होईल. कामात यश मिळेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील. 


सिंह : शुक्रवारी तुमच्या मनात एका व्यक्तीबद्दल आदर असेल. लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करा. बिझनेस डील आज महत्वाची ठरणार आहे. 


कन्या : या शुक्रवारी तुम्ही स्वतःवर भरोसा ठेवा. आजच्या शुक्रवारी तुम्हाला चांगला लाभ होईल. सामाजिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. 


तूळ : शुक्रवारी तुम्हाला सकारात्मक भावना अनुभवता येतील. खूप दिवसांपासून रखडलेली काम आज पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार बदलणार आहेत. 


वृश्चिक : शुक्रवारी बुद्धमान लोकांच्या संपर्कात याल. तुमचं घर आज पाहुण्यांनी भरलं आहे. भविष्यात आर्थिक स्थिती करता आतापासून प्रयत्नशील राहाल. व्यवसायात तुम्हाला फायदा होणार आहे. 


धनू : तुमचा शुक्रवार चांगला जाईल. तुमच्या सुख-सुविधा वाढतील. तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. व्यावसायिक करार फायदेशीर ठरू शकतात.


मकर : शुक्रवारी तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. व्यावसायिक बाबतीत चांगली रणनीती बनवण्याची गरज आहे. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवू शकते. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. 


कुंभ : या शुक्रवारी तुम्हाला ग्रहांच्या सामंजस्याचा लाभ मिळेल. योग्य वेळी केलेले काम तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्हाला कौटुंबिक संपत्तीचा पूर्ण लाभ मिळेल. \


मीन : शुक्रवारी जीवनसाथीची साथ राहील. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. काहीतरी नवीन शिकता येईल. तुम्हाला फायद्याच्या संधी सहज मिळतील. अनेक दिवस अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.