मुंबई: रविवारचा दिवस एक नवी आशा घेऊन येणारा असणार आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी रविवार अतिशय शुभ आहे. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. काही बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. अन्यथा तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया, रविवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: व्यवसायात आनंदाची बातमी मिळेल. वरिष्ठांसमोर आपली गोष्ट ठेवण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. 


वृषभ: आपल्याला रविवारी शुभ संकेत मिळू शकतात. जबाबदाऱ्या निभावण्यासाठी योग्य दिशा मिळेल.


मिथुन: रविवार तुमच्यासाठी खास असेल. तुमच्या मनात काही असेल तर ते व्यक्त करा. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. महिलांनी त्यांच्या करिअरबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या व्यवहारात सावध राहा.


कर्क: रविवार तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. व्यवसायात चांगला नफा होईल. तुम्ही भविष्य लक्षात घेऊन गुंतवणूक करू शकता. नोकरीत तुम्हाला यश मिळेल. कोणत्याही जबाबदार कामात निष्काळजी राहू नका.


सिंह: नोकरी करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायिकांसाठी संमिश्र दिवस असणार आहे. कामाच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील.


कन्या: स्वतःवर विश्वास ठेवा. अधिक नफा मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसायात नातेवाईकांचं सहकार्य घेऊ शकता. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


तुळ: कामात चांगल्या संधी मिळतील. सरकारी नियमांमुळे व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नव्या भेटी-गाठी होतील


वृश्चिक: तुमच्याकडे आज पैसे येऊ शकतात. नवीन प्रोजेक्ट हाती येतील. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत.


धनु: सकारात्मक विचारांनी कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. नोकरीत बँकिंग क्षेत्रातील लोकांना चांगला नफा मिळेल. रविवारचा दिवस फायद्याचा असणार आहे.


मकर: नवीन काम करण्याचा उत्साह असणार आहे. तुम्ही तुमच्या पराक्रम आणि धैर्याच्या जोरावर पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल.


कुंभ: तुमचं मत बदलण्याचा दिवस आहे. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली संधी आहे. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर या दोघांमध्ये यश मिळेल. 


मीन: वेळेचा योग्य उपयोग करणं हिताचं ठरेल. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. मालमत्तेशी निर्णय घेण्यासाठी रविवारचा दिवस खूप चांगला आहे.