Horoscope 27 December 2021 : `या` राशीच्या लोकांना सोमवारी मिळणार इच्छूक नोकरी
जाणून घ्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे.
मुंबई : सोमवारचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. नोकरीत-व्यवसायिंकाना धनलाभ होईल. विवाहासाठी उत्सूक असलेल्यांना स्थळ येईल. गुंतवणूक करण्याचा विचार करु शकता. जाणून घ्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे.
मेष (Aries)
या सोमवारी तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. इतरांच्या विचारांनी आणि बोलण्याने जास्त प्रभावित होऊ नका. कामाच्या बाबतीत दिवस तुमच्या अनुकूल असणार आहे. आर्थिक स्थितीबाबत अजून थोडी सावगिरी बाळगा.
वृषभ (Taurus)
सोमवारी तुम्ही तुमच्या व्यवसायाची पूर्ण काळजी घ्याल आणि तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही कामात तुमचा अनुभव फायदेशीर ठरेल. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात.
मिथुन (Gemini)
तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार कराल आणि त्यांची मनापासून सेवा कराल. तुमच्या व्यवसायात गती येईल आणि तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न कराल. कोणाचीही फसवणूक करू नका.
कर्क (Cancer)
सोमवारी तुम्ही कोणतंही काम नव्याने सुरू करू शकता. जर तुमचे कपड्यांचे दुकान असेल तर तुम्हाला चांगला फायदा होईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मित्रांची मदत मिळेल.
सिंह (Leo)
सोमवारी दुसऱ्याच्या कामावर मत देणं टाळा. तुम्हाला एखादा मोठी बिझनेस डील मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीची पुनर्रचना करताना स्वतःची काळजी घ्या.
कन्या (Virgo)
सोमवारी तुमच्या यशात जवळील लोक हातभार लावतील. तुम्हाला मोठ्या कंपनीकडून चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी व्यापारी वर्ग कर्जाचं नियोजन करू शकता.
तुळ (Libra)
तुमचा मूड खूप चांगला असेल. सोमवारी तुम्ही मेहनतीच्या जोरावर एखादं विशेष यश मिळवाल. पैशाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पैशाशी संबंधित नियम समजून घेणं आवश्यक आहे.
वृश्चिक (Scorpio)
तुम्ही कोणताही निर्णय घ्याल, तो निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुम्ही रहात असलेलं घर एकटं सोडू नका. अचानक कोणाची भेट होण्याचं रूपांतर गोड नात्यात होऊ शकतं.
धनु (Sagittarius)
या सोमवारी तुमचं मन प्रसन्न राहील. तुमची कामं काळजीपूर्वक करून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. व्यवसायात आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.
मकर (Capricorn)
सोमवारी जे आर्थिक प्रश्न आहेत ते संपण्याची शक्यता आहे. कोणत्याही सरकारी संस्थेच्या कामात तुम्ही तुमचं सहकार्य देऊ शकता. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
या सोमवारी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये अधिक रस असेल. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा कुटुंबावर लक्ष केंद्रित करणं चांगलं असेल. तुम्हाला हवी असलेली नोकरीही मिळू शकते.
मीन (Pisces)
सोमवारी तुमचं काम इतरांना आनंद देईल. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून समाधान मिळेल. गुंतवणुकीसाठी जाणकार लोकांची मदत घेऊ शकता. खाजगी नोकरी करणाऱ्यांनी बोलण्यात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.